*होय…..माळशिरस तालुक्यात फक्त मराठा समाजाचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न आहे*
माळशिरस तालुक्यातील मराठा समाजाला पण जात चोरांच्या उमेदवारी मुळे भविष्यात राजकीय झळा सहन कराव्या लागणार आहेत. देश स्वतंत्र होऊन ७८ वर्षे झाली आजपर्यंत माळशिरस तालुक्यातील मराठा समाजाने हा माळशिरस तालुका तळहाताच्या फोडा प्रमाणे जपलेला आहे. येथील सर्व सामान्य समाजाला न्याय देण्याचे काम केले आहे. तळागाळातील जनतेला साथ दिलेली आहे.
इथं केवळ आणि केवळ मराठा समाजाला प्रतिस्पर्धी म्हणून माळशिरस तालुक्यातील राखीव विधानसभेची उमेदवारी जात चोराला देण्यात आली आहे. भविष्यात या जात चोरांच्या हातात माळशिरस तालुक्याची राजकीय सत्ता गेली तर हा जात चोर मराठा समाजाला पुन्हा या तालुक्यात उभारी येऊ देणार नाही. हे मात्र निश्चित आहे.
आज चित्र दिसतांना जरी बरं वाटतं असले पण ते खरे नाही.मराठा समाजाचे राजकीय भविष्य मात्र धोकादायक आहे. राजकीय स्वार्थ साधण्यासाठी जात चोर काहीही करु शकतो हे या तालुक्यात चर्चिले जात आहे.
माळशिरस तालुक्यातील तमाम जनता केवळ मराठा समाजाला आपले सर्वस्व मानत आलेली आहे. माळशिरस तालुक्यातील जनतेच्या भावना आज मराठा समाजाला जाणवल्या नाहीत. तर भविष्यात मराठा समाजाला यांची मोठी किंमत मोजावी लागणार आहे. दलितांचे हक्क आज तुमच्या डोळ्यासमोर लुटले जाऊ लागलेत. फुले,शाहु, आंबेडकर, अण्णाभाऊ यांच्या पुरोगामी विचारला पायदळी तुडवले जाऊ लागले आहे.
तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सध्या राज्यात मोठे शक्ती प्रदर्शन करावे लागत आहे.आशा परिस्थितीत मराठा समाज गप्प का आहे. आजपर्यंत अनेक सामाजिक राजकीय शैक्षणिक कला क्रीडा क्षेत्रात मराठा समाजाला मदतीचा हात देणारे दलित बांधवांचा हक्क हिसकावून घेतला जाऊ लागला आहे. मग मराठा समाजाला भविष्यात या दलित समाजाची गरज वाटत नाही का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
आज दलितांचे हक्क लुटताना तुमची भुमिका स्पष्ट केली पाहिजे अन्यथा भविष्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये तुमच्या बद्दल हाच दलित समाज वेगळा विचार करु शकतो. तुमच्या गाव पातळीवरच्या राजकीय घडीला विस्कळीत करण्याचा प्रयत्न जात चोराला पुढे करून केला जात आहे. आज तुम्ही दुसऱ्याचे अधिकार वाचवू शकत नसाल तर भविष्यात तुमचे हक्क हि हिसकावून घेतले जाणार आहेत. म्हणून वेळ गेलेली नाही. अजून हि बरं काही करता येते मराठा समाजाने कोंबडं झाकून ठेवण्याचा प्रयत्न करु नये.
माळशिरस तालुक्यातील जनता हि सुज्ञ आहे. सर्व काही जनतेला आता कळतं आहे. आज तुम्ही स्वार्थी भुमिका ठेवून माळशिरस तालुक्यातील जनतेला असे वार्यावर सोडणार असाल तर भविष्यात हिच जनता तुम्हाला आजच्या परिस्थितीची जाणिव त्यावेळी नक्की करुन देईल मग तुम्हाला जाणवेल सर्वांचेच हक्क आणि अधिकार ज्या त्या वेळी वाचवले पाहिजे होते.
आज जात चोर या तालुक्यांचा आमदार झाला तर भविष्यात माळशिरस तालुक्यात मराठा समाजातील एखाद्याला ग्रामपंचायत सदस्य करायला पण संघर्ष करावा लागणार आहे.यांचा गांभीर्याने विचार तमाम सकल मराठा समाज करेल हि अपेक्षा