कागदी डिस्पोजेबल कपमध्ये चहा-कॉफी पिताय?सावधान!!कागदी कप देतोय कर्करोगाला निमंत्रण.
अकलूज (प्रतिनिधी ): आजमितीला महाराष्ट्र राज्यात जवळपास प्रत्येक व्यक्तीला चहा पिण्याची आवड आहे. चहाप्रेमी आपल्याला परिसरात प्रत्येक कोपऱ्यात सापडतील.
महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यात, शहरात, ग्रामीण भागात खेड्यात आणि परिसरात जवळजवळ प्रत्येक चौकात, गल्लीबोळात चहाची टपरी सध्या उपलब्ध आहे.
अनेकदा कुठे तरी बाहेर जाता जाता तुम्ही चहा प्यायला थांबता. बर्याच वेळा चहाच्या कपचे डिझाइन पाहून एखाद्याला चहा पिण्याची तलफ येते. परंतु, या सगळ्यात जर आपण पेपर कपमध्ये चहा पीत असाल, तर आपण आत्ताच सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. असे केल्याने तुमच्या आरोग्यावर मोठे संकट ओढवू शकते. त्याचा तुमच्या जीवनशैली आणि आरोग्यावरही खूप वाईट परिणाम होतो. जर तुम्हालाही पेपर कपमध्ये चहा पिण्यास आवडत असेल, तर आजच तुम्ही तुमची ही सवय बदलली पाहिजे.
अलिकडील एका अभ्यासामध्ये असे आढळले आहे की, जर एखादी व्यक्ती कागदाच्या कपात दिवसातून तीन वेळा चहा घेत असेल, तर यावरील प्लास्टिकचे 75,000 मायक्रोस्कोपिक कण शरीरात शिरकाव करतात. आता आपण फक्त अंदाज लावू शकता की, कागदाचा बनलेला कप एकदा वापरणे देखील किती हानिकारक आहे…
या कपात हायड्रोफोबिक फिल्म वापरली जाते.आयआयटी खडगपूरने पेपर कपमध्ये चहा पिण्यावर अभ्यास केला आहे, ज्यामध्ये आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांविषयी सांगण्यात आले आहे. या संशोधनाचे नेतृत्व करणारे आयआयटी खडगपूर येथील असोसिएट प्रोफेसर सुधा गोयल यांनी असे म्हटले आहे की, डिस्पोजेबल कपमध्ये पेय पिणे सामान्य आहे, परंतु हे आपल्या आरोग्यासाठी एक घातक विष म्हणून काम करते.
नुकत्याच झालेल्या अभ्यासानुसार, संशोधनाने हे निश्चित केले आहे की अशा कपांमध्ये प्लास्टिक आणि इतर हानिकारक पदार्थांमुळे गरम द्रव पदार्थ दूषित होतो. हे कप तयार करण्यासाठी, हायड्रोफोबिक फिल्मचा एक थर त्यावर बसवला गेला आहे, जो बहुधा प्लास्टिकचा बनलेला आहे. याच्या मदतीने, कपमधील द्रव आत टिकून राहतो. परंतु, गरम पाणी किंवा चहा-कॉफी यात ओतल्यानंतर 15 मिनिटांत हा थर वितळण्यास सुरुवात होते.
या संशोधनाचे नेतृत्व करणाऱ्या आयआयटी खडगपूर येथील असोसिएट प्रोफेसर सुधा गोयल यांनी नमूद केले आहे की, आमच्या अभ्यासानुसार, एका कपात 100 मिली गरम द्रव पदार्थ 15 मिनिटे ठेवल्यास 25,000 मायक्रॉन आकाराचे प्लास्टिकचे कण विरघळतात.
म्हणजेच, दिवसांतून तीन वेळा कागदी कपातून चहा पिणाऱ्या एका व्यक्तीच्या शरीरात प्लास्टिकचे तब्बल 75,000 मायक्रोस्कोपिक कण शिरतात, जे थेट डोळ्यांना दिसत नाही. याचा तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
सध्या जवळपास सर्वत्रच अनेक चहाच्या फ्रँचायसी आहेत. या ठिकाणी देखील अपवाद वगळता मोठया प्रमाणावर कागदी कप वापरले जातात.याशिवाय इतर अनेक चहाची टपरी, हॉटेल मध्ये कागदी कप वापरले जातात.काही ठिकाणी मात्र स्टील व काचेच्या ग्लास मध्ये तसेच चिनीमाती च्या कपातून चहा दिला जातो.
अनेक ठिकाणी चहा विकणारे फेरीवाले आहेत. जे कम्पलसरी कागदी कपातून चहा देतात.
एका सर्वेक्षण नुसार दररोज जवळपास संपूर्ण महाराष्ट्र राज्यात लाखो कागदी कपातून चहा दिला जातो. चहा पिऊन झालेनंतर हे कप तसेच इतस्तत:फेकून दिले जातात. कधी आडबाजूला अथवा गटारी मध्ये टाकून दिले जातात.त्यामुळे नागरिकांच्या आरोग्या बरोबरच शहराचे सौन्दर्य देखील धोक्यात आले आहे.
अनेक ठिकाणी अनेक व्यापारी कागदी कपाची होलसेल विक्री करतात. तर काही फेरीवाले चहाची टपरी व हॉटेल मध्ये कागदी कपाची डिलिव्हरी करतात. त्यामुळे सहजासहजी हे कप विक्री होतात.या कागदी कपातून अनेक चहा प्रेमी ची तलफ भागत असली तरी आरोग्यावर मात्र विपरीत परिणाम होत आहे. ही धोक्याची घंटा आहे.
कागदी कपातून चहा पिण्याची अनेकांना सवय असते. मात्र, हीच सवय आरोग्यास हानीकारक असून एका दिवसात तीन वेळा कागदी कपातून चहा प्यायल्यास सूक्ष्मस्वरूपातील प्लास्टिकचे जवळपास ७५ हजार कण शरीरात जात असल्याचे संशोधन आयआयटी खड्गपूर येथील संशोधकांनी केले आहे. आयआयटी खड्गपूर येथील सहायक प्राध्यापिका सुधा गोयल यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या संशोधनात विघटनशील कागदी कपांच्या वापरांचे अनेक दुष्परिणाम समोर आले आहेत.प्राध्यापिका गोयल म्हणाल्या की, आपल्यापैकी अनेकांना कागदी कपांतून चहा पिण्याची सवय असते. कागदी कपात जेव्हा वाफाळता चहा ओतला जातो, त्यावेळी त्यातील प्लास्टिकचे सूक्ष्मकण आणि विषारी घटक चहात मिसळतात. कागदी कप ओला होऊ नये म्हणून त्यावर प्लास्टिकपासून तयार केलेल्या हायड्रोफोबिक फिल्मचा थर लावलेला असतो. कपामध्ये उकळते पाणी किंवा चहा ओतल्यास १५ मिनिटांमध्ये त्यात विघटित होतात.याबाबत दोन वेगवेगळ्या प्रकारे अभ्यास करण्यात आला. पहिल्या टप्प्यात उकळते पाणी कागदी कपात ओतण्यात आले आणि ते १५ मिनिटांसाठी ठेवण्यात आले असता पाण्यात प्लॅस्टिकचे सूक्ष्मकण आणि अतिरिक्त आयन आढळून आले. दुसऱ्या टप्प्यात कागदी कप उकळत्या पाण्यात बुडवण्यात आला असता कपावरील हायड्रोफोबिक फिल्म काळजीपूर्वक काढण्यात आले. त्यानंतर ती फिल्म ८५९० अंश सेल्सिअस पाण्यात १५ मिनिटांसाठी ठेवण्यात आली. त्यातून आलेल्या निदर्शनानुसार, प्लास्टिकमधील अनेक विषारी घटक पाण्यात आढळून आले. पाण्यातील सूक्ष्मप्लास्टिक हे पॅलाडियम, क्रोमियम, कॅडमियम यांसारख्या विषारी घटकांचे वाहक असतात. त्यामुळे अनेक सजीवांमध्ये हे विषारी घटक प्रवेश करतात, अशी माहिती प्रा. गोयल यांनी दिली.
चौकट :-
भविष्यात होणारा वाढता धोका लक्षात घेऊन व नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून संबंधित विभागाने सदर कागदी कपाचे उत्पादन, साठवणूक, विक्री करणारे यांचेवर कायदेशीर कारवाई करून तसेच कागदी कपाच्या उत्पादनावर कायमस्वरूपी बंदी घालावी. अशी मागणी चहा प्रेमी यांचेकडून होत आहे.