सोलापूर/प्रतिनिधी भैय्या खिलारे:
यंदाची पोलिसांची दिवाळी निवडणुकीच्या बंदोबस्तात आणि धावपळीत जाणार आहे. पोलिसांच्या रजा, सुट्या २५ नोव्हेंबरपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्या कुटुंबीयांना कुटुंबप्रमुखाशिवाय सण साजरा करावा लागणार असे चित्र दिसते.लोकसभा निवडणुकीत जवळपास दोन महिने पोलिस बंदोबस्तात व्यस्त होते. त्यानंतर थोड्या दिवसाची विश्रांती मिळाली. पुन्हा गणेशोत्सवात पोलिस यंत्रणा बंदोबस्तासाठी रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. त्यानंतर नवरात्रोत्सवाचा बंदोबस्तही झाला.विधानसभा निवडणुकीचा धमाका ऐन दिवाळीत सुरू होणार असल्याचे संकेत मिळाले होते. त्यानुसार यंदाच्या दिवाळीतच निवडणुकीच्या धामधुमीला सुरुवात झाली. उमेदवारांच्या अर्ज भरण्यापासून ते निकालापर्यंत पोलिसांना दक्ष राहावे लागते. कायदा व सुव्यवस्था कायम ठेवून निवडणूकविधानसभा निवडणुकीचा धमाका ऐन दिवाळीत सुरू होणार असल्याचे संकेत मिळाले होते. त्यानुसार यंदाच्या दिवाळीतच निवडणुकीच्या धामधुमीला सुरुवात झाली. उमेदवारांच्या अर्ज भरण्यापासून ते निकालापर्यंत पोलिसांना दक्ष राहावे लागते. कायदा व सुव्यवस्था कायम ठेवून निवडणूकशांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांना रात्रंदिवस सज्ज राहावे लागते. यंदा तर दिवाळी सणाचा बंदोबस्त आणि निवडणूक दोन्हीकडे पोलिस यंत्रणेला लक्ष द्यावे लागणार आहे. निवडणुका म्हटले की, पोलिसांच्या रजा आणि सुट्या बंद होतातयंदाच्या विधानसभा निवडणुकीत शहरातील तीन व जिल्ह्यातील आठ अशा एकूण ११ मतदारसंघात पोलिस बंदोबस्त तैनात असणार आहे. शहर पोलिस आयुक्तालयांतर्गत पोलिस आयुक्त, ०३ पोलिस उपायुक्त,०५ सहायक पोलिस आयुक्त, ६४ सहायक पोलिस निरीक्षक-पोलिस उपनिरीक्षक, ८६९ पोलिस अंमलदार, ०१ प्रशिक्षणार्थी सहायक पोलिस आयुक्त, २५ प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक, २५ प्रशिक्षणार्थी पोलिस अंमलदार, एकहजार होमगार्ड, एक एसआयपीएफची तुकडी असणार आहे. पोलिस अधीक्षक, अपर अधीक्षक, ८ उपअधीक्षक, २८ पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक, १३२ पोलिस उपनिरीक्षक, २६७८ पोलिस कर्मचारी आणि होमगार्ड १५९५ असा जवळपास साडे सहा हजारहून अधिक कर्मचारी, अधिकारी यांचा बंदोबस्त सज्ज असणार आहे.जिल्ह्यात बंदोबस्तासाठी पोलिस कर्मचारी दूरवरूनही येतात. अनेकांना घरदार सोडून कर्तव्य बजवावे लागते. त्यामुळे अनेकांना निकालानंतरच कुटुंबीयांची भेट घेता येणार आहे२५ नोव्हेंबरपर्यंत साप्ताहिक सुटी, रजा रद्द पोलिस महासंचालकांनी दिलेल्या आदेशानुसार २५ नोव्हेंबरपर्यंत पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्या साप्ताहिक सुट्या आणि रजा रद्द करण्यात आल्या आहेत.केवळ वैद्यकीय रजा आणि अत्यावश्यक कारणासाठीच्या रजा घेता येणार आहेत. जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात जवळपास साडे सहा हजारहून अधिक पोलिस, होमगार्ड, राज्य राखीव दलाचे पोलिस यांचा बंदोबस्त राहणार आहे.