दि.११ (केदार लोहकरे याजकडून)आज कोल्हापूर दि 10/5 मा.उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठकडील रीट पिटिशन नंबर 2111
/2022 मधील आदेशानुसार 12 जुलैचे तुकडे बंदीचे परिपत्रक महाराष्ट्र नोंदणी अधिनियम 1961 चे नियम क्रमांक 44(1) ई रद्द केलेने खरेदी विक्री व्यवहार पूर्ववत चालू करा अशा आशयाचे निवेदन कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड.गिरीश खडके,सचिव अॅड.विजयकुमार ताटे-देशमुख यांचे उपास्थित वकिल संघटने मार्फत मुद्रांक जिल्हाधिकारीसो मल्लिकार्जुन माने यांना देण्यात आले. यावेळी निवेदनात असे मागणी केली की 12 जुलैचा परिपत्रक नुसार गेली 11 महिने तुकडे बंदीचे व्यवहार बंद आहेत तरी ते सदर रिट पिटिशन आदेशनुसार तुकडे बंदीचे परिपत्रक रद्द करणेत आलेले आहे तरी बंद असलेले व्यवहार पूर्ववत चालू करावेत अशी मागणी करण्यात आली आहे.यावेळी मिळकत सर्च रिपोर्ट ऑनलाईन पाहत असताना वकिलांना येणाऱ्या अडचणी देखील सांगण्यात आल्या त्यामध्ये सरोवर खूप वेळा डाऊन असणे,ई म्युटेशन मधून झालेल्या दस्ताची नोंद दिसून न येणे,पेड सर्च टॅब मधून सर्च पाहिला असता सण 2022 चा टॅब दिसून येत नाही. यावेळी निवेदन वर बोलताना मल्लिकार्जुन माने यांनी सांगितले की, आपल्या निवेदनाचा तातडीने विचार करून त्यानुसार वरिष्ठ पातळीवरून निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले. यावेळी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे सभासद वकील अॅड.मिलिंद शेडसाळ,अॅड.निखिल शिराळकर,अॅड.साईप्रसाद भाकरे,अॅड.तेजगोंड पाटील,अॅड.अब्दुल मुल्ला,अॅड.बबन पवार,अॅड.प्रशांत पाटील,अॅड.विवेक पाटील,अॅड.महांतेश कोल्हे इत्यादी उपस्थित होते.
🙏1ch No. ☝👍✌👌💪👏🙏
Aklujche graamdaivat aklaai devi