*सहकार महर्षी अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत प्रथम वर्ष इंजिनिअरिंगच्या कॅप राऊंड -३ चे ऑप्शन फॉर्म भरण्याची सुविधा जिल्ह्यातील विविध ठिकाणी उपलब्ध*
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये प्रथम वर्ष पदवी इंजिनिअरिंग प्रवेशासाठी कॅप राऊंड ३ चे ऑप्शन्स भरण्याची प्रक्रिया आज दि. ३१ऑगस्ट पासून सुरू झाली असून सहकार महर्षि इंजिनियरिंग कॉलेज कडून सदर फॉर्म भरण्याची मोफत सुविधा जिल्ह्यातील विविध ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
प्रवेशाच्या पहिल्या आणि दुसऱ्या फेरीमध्ये सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च कॉलेजला विद्यार्थी व पालकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयास नॅक मूल्यांकनामध्ये ए श्रेणी प्राप्त, विद्यार्थ्यांना माफक फी मध्ये प्रवेश, विद्यार्थ्यांचे वार्षिक परीक्षांचे निकाल , प्लेसमेंट मधून निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या , सोयी सुविधा व उच्चशिक्षित प्राध्यापक वर्ग या गोष्टींचा विद्यार्थी व पालकांनी प्रामुख्याने विचार केलेला दिसून येत आहे.
एकूणच सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळणे ही बाब आपल्या उज्वल भविष्यासाठी गरजेची असल्याचे पालकांनी व विद्यार्थ्यांनी पूर्णपणे ओळखले आहे हेच आधीच्या प्रवेश फेऱ्यांमधून दिसून येते असे प्रतिपादन सहकार महर्षि पदवी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी केले शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी प्रथम वर्ष पदवी इंजीनियरिंग प्रवेशाचे तिसरी फेरी (थर्ड कॅप राऊंड )चे ऑप्शन फॉर्म भरण्याची प्रक्रिया शनिवार दि. ३१ ऑगस्ट पासून ते सोमवार दि. २सप्टेंबर २०२४ हे तीन दिवस चालणार आहे. ज्यांना पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळाला नाही व ज्यांनी दुसऱ्या फेरीत नॉन फ्रिज/ बेटरमेंट केले आहे त्यांना या तिसऱ्या फेरीचा लाभ घेता येणार आहे अशी माहिती अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता प्रा. सागर फुले यांनी दिली. सन २०२४-२५ च्या पदवी अभियांत्रिकीच्या प्रवेशा करिता यापूर्वीच ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म भरणे, भरलेले अर्ज स्वीकारून कागदपत्रांची तपासणी, पडताळणी अर्ज निश्चित करणे आधी प्रक्रिया नंतर ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी पहिल्या व दुसऱ्या प्रवेश फेरीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे .
मागील दोन्ही फेरीत योग्य महाविद्यालय अथवा योग्य ब्रँच मिळाली नसेल अथवा कुठेच प्रवेश मिळाला नसेल अशा विद्यार्थ्यांसाठी तिसरी फेरी ही शेवटची संधी असणार आहे त्यामुळे योग्य महाविद्यालय व योग्य अभ्यासक्रम याबाबतचे पसंती क्रम ऑनलाईन भरावे लागणार आहेत यासाठी मागील दोन कॅप राऊंड मध्ये झालेल्या चुका टाळून व कट ऑफ चा पूर्णपणे अभ्यास करून कॅप राऊंड -३ चे ऑप्शन फॉर्म भरणे गरजेचे आहे. पालक व विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेताना महाविद्यालयाचे नॅक मानांकन, कॅम्पस प्लेसमेंट संख्या, कॅम्पस मधून मिळणारे संस्कार, शैक्षणिक वातावरण, सोयी सुविधा, उच्चशिक्षित प्राध्यापक वर्ग या बाबींचा प्रामुख्याने विचार करणे आवश्यक आहे
या संदर्भात अधिक माहितीसाठी प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता प्रा. सागर फुले (मो.नं. ७३५०१५५५००) यांना संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे