*WMO (वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन ) स्वयंसेवकांचा प्रामाणिक पणा तिन तोळ्याची सोन्याची चैन दिली माघारी*
माळशिरस प्रतिनिधी रणजितदादा गायकवाड
दि 12 आक्टोंबर दिवशी श्री क्षेत्र नारायणगड येथे मराठा योध्दा मनोजदादा जरंगेपाटिल यांच्या उपस्थितीत न भुतो ना भविषतो आशा प्रचंड गर्दीत दसरा मेळावा संपन्न झाला या दसरा मेळाव्यासाठी जमलेल्या गर्दीने देशातील सर्व उच्चांक मोडून काढले मनोजदादा जरंगेपाटिल यांच्या वर प्रेम करणारा बहुजन समाज एकत्र येऊन मनोजदादा चे विचारांचे सोने लुटण्यासाठी उपस्थित होता या गर्दीला वाट करून देण्यासाठी वाहतूक व्यवस्था सुरळीत चालू ठेवण्यासाठी आनेक संघटनांनी युवकांनी पुढाकार घेऊन वाहतूक व्यवस्था चोख ठेवली होती सर्व बांधवांना सुरक्षित नारायणगड येथे येण्यासाठी व परत जाताना त्रास होऊ नये म्हणून दोन दिवस उपस्थित असणाऱ्या वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन च्या स्वयंसेवकांनी पोलिस व स्थानिक युवकांच्या सहकार्याने चोख कामगिरी बजावली
त्यातच *WMO (वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन)च्या सदस्य सिध्दार्थ देशमुख* (पाणीव ता माळशिरस) यांना सापडलेली दोन लाख रुपये किंमतीची सोन्याची चैन गेवराई येथील हेमंत खराडे बांधवाला परत देवून वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन च्या स्वयंसेवकांचा प्रामाणिक पणा जगासमोर आणला त्यांच्या या प्रामाणिक पणाच सर्व स्तरातून स्वागत होत आहे