*अकलूजच्या गृहविज्ञान महिला महाविद्यालयास नॅक कमिटीची भेट..**
संग्रामनगर दि.11 (केदार लोहकरे याजकडून)अकलूज येथील श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील गृहविज्ञान महिला महाविद्यालयास बेंगलोरच्या राष्ट्रीय मूल्यांकन व मानांकन परिषदेच्या तज्ञ समितीने दिनांक ९ व १० मे रोजी भेट देऊन विविध सुविधा व उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त केले.त्रिसदस्यीय समितीत छत्तीसगड राज्यातील दुर्ग येथील हेमचंद यादव विद्यापीठाच्या कुलगुरू व समितीच्या अध्यक्षा डॉ. अरुणा पलटा,नवी दिल्ली येथील जमिया मिल्लिया इस्लामिया विद्यापीठातील मानसशास्त्र विभागाचे प्राध्यापक व समितीचे समन्वयक सदस्य डॉ.मोहम्मद शफिक,हरियाणा राज्यातील कुरुक्षेत्र येथील आय.जी.एन.महाविद्यालयाच्या माजी प्राचार्या व समितीच्या सदस्या डॉ.प्रेम कुमारी गुप्ता यांचा समावेश होता.या समितीने महाविद्यालयातील अन्न व पोषण शास्त्र विभाग,मानव विकास विभाग,कौटुंबिक संसाधनांचे व्यवस्थापन विभाग,वस्त्रशास्त्र व परिधान विभाग,विस्तार शिक्षण विभाग,विज्ञान विभाग,इंग्रजी विभाग या सात प्रमुख विभागासह क्रीडा विभाग,प्रशासकीय विभाग,ग्रंथालय विभाग,सांस्कृतिक विभाग,राष्ट्रीय सेवा योजना विभाग,समुपदेशन विभाग,महिला वसतिगृह यासह विद्यार्थिनींसाठी आवश्यक असणाऱ्या इतर पूरक विद्यार्थीकेंद्रित सोयीसुविधांचा सूक्ष्म आढावा व माहिती घेऊन समाधान व्यक्त केले. शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका व महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षा स्वरुपाराणी जयसिंह मोहिते-पाटील,संस्थेचे सचिव अभिजीत रनवरे,सहसचिव हर्षवर्धन खराडे,सदस्या निशा गिरमे,हेमलता चांडोले,वसंतराव जाधव,रामभाऊ गायकवाड,पांडुरंग एकतपुरे,उत्कर्ष शेटे यांच्यासह सर्व संचालक मंडळासोबत समितीने चर्चा करून समाधान व्यक्त केले.तसेच माजी विद्यार्थिनी व पालक यांच्याशी सदर समितीने संवाद साधला व समाधान व्यक्त केले.त्याचबरोबर महाविद्यालयातील प्राध्यापकांचे संशोधन व प्रकाशनाविषयी माहिती घेऊन समाधान व्यक्त केले.याप्रसंगी सांस्कृतिक विभागातर्फे महाराष्ट्रीयन लोकसंस्कृतीचे दर्शन घडविण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने समिती सदस्य भारावून गेले व विद्यार्थिनींचे कौतुक केले.याप्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका व महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षा स्वरुपाराणी जयसिंह मोहिते-पाटील, संस्थेचे सचिव अभिजीत रनवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे, सदस्या निशा गिरमे, हेमलता चांडोले यांच्यासह सर्व सदस्य व महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. राहुल सुर्वे उपस्थित होते.