राज्य पौष्टिक तृणधान्य अभियान अंतर्गत माळशिरस तालुक्यात अनेक बोगस लाभार्थी तालुका कृषी कार्यालयाकडे वरिष्ठ लक्ष देतील काय
अकलूज (प्रतिनिधी )माळशिरस तालुका कृषी विभागाच्या वतीने राज्य पौष्टिक तृणधान्य अभियान अंतर्गत अनेक बोगस लाभार्थी दाखवले गेले आहेत. तालुका कृषी विभागावर कोणाचेच नियंत्रण नसून तालुका कृषी अधिकारी रजेवर तर गावपातळीवरील कृषी सहाय्यक कार्यालयात न थांबता कायमच फिरतीवर असतात. त्यामुळे अनेक हेलपाटे घालूनही कृषी सहाय्यकाचे तोंड पाहायला मिळतच नसल्याची स्थिती आहे.
माळशिरस तालुका कृषी कार्यालयामार्फत 1जानेवारी 2022ते 31डिसेंम्बर 2023 या काळात शेतकरयांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान कडधान्य सन 2021 22.राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत बाजरी प्रकल्प ज्वारी, हरभरा हे प्रकल्प. तसेच राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत महाराष्ट्र पौष्टिक तृणधान्य अभियान सन 2023 24 असे प्रकल्प राबविण्यात आले आहेत.राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य पौष्टिक तृणधान्य अभियान अंतर्गत मोफत देण्यात आलेल्या बि, बियाणे. किटकनाशके व इतर औषधे यांच्या लाभार्थी यादीत अनेक बोगस नावं आसल्याचे उघड झाले आहे.
माहिती अधिकारांतर्गत प्राप्त झालेल्या माहीतीमध्ये ज्या शेतकऱ्यांना लाभार्थी दाखवलं आहे त्याची शहानिशा केली असता जवळपास निम्म्या पेक्षा जास्त लोकांना या यादीत आपले नाव कसं आलं आहे हेच सांगता येईना तसेच त्या शेतकरयांना अशा काही योजना सुरू आहेत याबाबत सुध्दा काही माहिती नव्हती.मग प्रश्न असा पडतो की त्यांची नावे त्या यादीमध्ये कोणी समाविष्ट केली व त्यांना देण्यात आलेलं बि बियाणे किटकनाशके व इतर जैविक औषधे कुणाला दिली.
याची सखोल चौकशी करण्याची गरज निर्माण झाली आहे. तालुक्यातील अनेक गावांतील शेतकरयांना शासनाने गावांसाठी कृषि सहाय्यक नियुक्त केले आहेत हेच माहीत नाही .
या कालावधीत वाटप करण्यात आलेल्या बि बियाणे किटकनाशके व इतर औषधे कुणाला दिली.कशी दीली याची वरिष्ठ पातळीवरून सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
*चौकट :-.
*कृषी सहाय्यकांबाबत अनेक तक्रारी…..
माळशिरस तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांना आपल्या गावात कृषी सहाय्यक कोण आहे अथवा ते कार्यालयात कधी भेटतात याबाबत काहीच कल्पना नसते. कृषी सहाय्यक ठराविक मोठ्या शेतकऱ्यांशी लागेबांधे ठेवतात.कृषि सहाय्यक यांनी आपल्याला नेमून दिलेल्या भागातील शेतकऱ्यांना शासनाच्या योजना समजावून सांगणे अपेक्षित असताना, शेतकऱ्यांना मात्र कृषि सहायक माहित नसणे हे दुर्दैवी आहे. इतर शेतकऱ्यांना ते जाणीवपूर्वक टाळत असल्याचेही चित्र समोर येत आहे. माळशिरस तालुक्यात जवळपास 50कृषि सहाय्यक आहेत. परंतु यातील बहुतांश कृषी सहाय्यक त्यांच्या नेमलेल्या कार्यालयात आठ-आठ दिवस नसतात. तर अनेक कार्यालये बंद असतात.अशी अवस्था अनेक गावातून आहे.