अकलूज मध्ये नामवंत दुध डेअरी च्या म्हशीच्या दुधाची चढ्या दराने विक्री
अकलूज (प्रतिनिधी )अकलूज मध्ये कोल्हापूर येथील नामवंत दुध डेअरी चे दुध पुणे वरून बारामती व बारामती येथील विक्रेत्या मार्फत अकलूज येथील बहुतांश दुध डेअरी, स्विट होम येथे विक्रीसाठी येते.अकलूज परिसरातील बरेच ग्राहक हे दुध विकत घेतात. काही दुकानदार प्रामाणिकपणे छापील किमतीत दुधाची विक्री करतात. परंतु इतर बरेच विक्रेत्यांकडून म्हशीच्या दुधाच्या पिशवीची छपाई किमतीपेक्षा जादा दराने विक्री केली जात आहे.
माळशिरस तालुक्यातील अकलूज हे शहर मोठ्या बाजारपेठेचे आहे. येथे नागरिकांची दिवसभर वर्दळ असते. येथे चहा व्यवसाय प्रसिद्ध आहे. त्यामुळे येथील चहा विक्रेत्यांना दिवसभरात हजारो लिटर म्हशीचे दूध आवश्यक असते. तसेच येथील ग्राहक हे मोठ्या प्रमाणात म्हशीचे दूध खरेदी करत असतात. त्यामुळे येथील चहा विक्रेते व स्वीट होम दुकानदार, डेअरी हे गेल्या अनेक वर्षांपासून विक्रीसाठी विविध कंपन्यांचे दूध खरेदी करत आहेत
.म्हशीच्या दूध पिशवीवर ७२ रुपये लिटर व ३६ रुपये अर्धा लिटर अशी छापील किंमत असतानाही येथील स्वीट होम विक्रेते व दुध डेअरी दुकानदार ग्राहकांना अर्धा लिटर दुधाची पिशवी 37 दराने विक्री करत आहेत. शिवाय बऱ्याच वेळेस हे दूध खराब होते. काहीवेळेस दुकानदार दूध बदलून देतात. तर काहीवेळेस मात्र बदलून देण्यासाठी टाळाटाळ करतात.अकलूज मध्ये दररोज जवळपास 1000लिटर दूध विक्री केले जाते.प्रत्येक लिटर मागे 2रुपये जादा दर आकारला जातो.
यासंदर्भात विचारणा केली असता हे दुध बारामती वरून येते. आम्हाला परवडत नाही. तुम्हाला काय करायचे ते करा. आम्ही 37रुपयेच घेणार.असे मगृरीचे उत्तर दिले जाते.
छापील किमतीपेक्षा जादा दराने कुठल्याही वस्तूची विक्री करू नये, केल्यास दंड आकारणी केली जाते.असा शासनाचा कायदा असतानाही येथे चढ्या दराने विक्री होत आहे.
तरी संबंधित विभागाने अशा दूध विक्रेत्यांवर त्वरित कारवाई करावी.अशी मागणी ग्राहक वर्गातून होत आहे.