*अकलूज नगर परिषद मार्फत स्वीप अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन*
254-माळशिरस विधानसभा मतदासंघामध्ये मतदान जनजागृती करिता मा. निवडणुक निर्णय अधिकारी श्रीमती विजया पांगारकर व नोडल अधिकारी स्वीप मा. दयानंद गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज नगरपरिषदेने स्वीप अंतर्गत जनजागृतीचा उपक्रम राबविला आहे. त्यामध्ये मुख्य चौकात दर्शनी भागामध्ये मतदान EVM मशीन, महाराष्ट्राचा नकाशा व मतदान निशाणी बोट मतदारांना मतदानासाठी आवाहन करण्याकरिता उभारण्यात आले आहे.
त्यानिमित्त आज शनिवार दिनांक 9 नोव्हेंबर 2024 रोजी अकलूज नगर परिषद मार्फत सदूभाऊ चौक येथे त्याचे उद्घाटन माननीय निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अधिकारी विजया पांगारकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सुरेश शेजुळ, स्वीप नोडल अधिकारी तथा मुख्याधिकारी अकलूज नगरपरिषद दयानंद गोरे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी माळशिरस नगरपंचायत कल्याण हुलगे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर तहसीलदार डॉ. व्यवहारे साहेब , तालुका कृषी अधिकारी आबासाहेब रुपणवर साहेब, सदाशिवराव माने विद्यालयाचे प्राचार्य अमोल फुले, सहाय्यक नोडल अधिकारी पवन भानवसे, सहाय्यक नोडल अधिकारी मनोज गवळी , सहाय्यक नोडल अधिकारी सुनील काशीद व विविध संघटनांचे प्रतिनिधी, व अकलूज नगरपरिषद सर्व कर्मचारी व नागरीक यांच्या मार्फत करण्यात आले. तसेच विविध संघटनांचे अध्यक्ष, प्रतिनिधी उपस्थित होते. उपस्थित प्रतिनिधींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी डॉक्टर संघटना यांचे मार्फत डॉ. संतोष खडतरे व डॉ. संजय सिद, लाकूड व्यापारी संघटना मार्फत सलीम सय्यद , ज्येष्ठ नागरिक संघटना यांचे मार्फत सुधाकर कुंभार, महाबळेश्वर कुंभार, अनिल अन्नदाते नामदेव फुले ,युवा संघटना ( प्रथम मतदाता) आदित्य क्षीरसागर, रिक्षा चालक संघटना सलीम तांबोळी, दिलीप कांबळे , सफाई कर्मचारी संघटना आशा खंडागळे, संगीता मोरे , महिला बचत गट संघटना सारिका शिंदे , मनीषा क्षीरसागर , पत्रकार संघटना विलासनंद गायकवाड कापड व्यापारी संतोष जमादार , तरकारी व्यापारी संतोष जाधव, हातगाडा संघटना कबीर मिलानी पनन खाते उदय शेटे इत्यादींनी मतदान करण्याचे मतदारांना आवाहन केले.सदरील देखावा हा निवडणुक दिनांकापर्यंत सदुभाऊ चौक येथे ठेवला जाणार असून त्यामध्यामातून तालुक्यात मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्यास मदत होणार आहे.