*अकलूज नगरपरिषद, रोटरी क्लब अकलूज व रोटरी क्लब सराटी डिलाईट यांच्या संयुक्त विद्यमाने रन फॉर वोट स्पर्धेचे आयोजन*
आगामी विधानसभा निवडणूक-2024 चे मतदान 20 नोव्हेंबर 2024 रोजी पार पडणार आहे.सदरील दिवशी जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानाचे पवित्र कर्तव्य पार पाडून मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता मा.निवडणूक आयोग यांचे निर्देशानुसार प्रशासन विविध उपक्रमांद्वारे जनजागृती करीत आहे.
या अंतर्गतच 254-माळशिरस विधानसभा(अ.जा.) मतदारसंघांमध्ये अकलूज नगरपरिषद,रोटरी क्लब अकलूज व रोटरी क्लब सराटी डिलाईट यांनी ‘RUN FOR VOTE’ या स्वरूपाची मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करून मतदान जनजागृती चा अभिनव उपक्रम राबविला.
सदरील ‘RUN FOR VOTE’ मॅरेथॉन स्पर्धा अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल येथे दिनांक 14 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी ०७.०० वाजता आयोजित करण्यात आली होती.सदरील मॅरेथॉन ही सर्व वयोगटातील नागरिकांकरीता होती.या अंतर्गत मुलींकरिता ०३ कि.मी.धावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असता त्यामध्ये एकूण १८ मुलींनी सहभाग नोंदविला होता.
तसेच पुरुषांकरिता ०५ किमी धावण्याचे उद्दिष्ट ठेवले असता यामध्ये एकूण ६२ मुले व नागरिक सहभाग घेतला विशेष म्हणजे ७ वर्षाची २ मुले यांनी ०३ किमी धावून मॅरेथॉन पूर्ण केली.
यामध्ये अकलूज परिक्षेत्राचे पोलीस उपविभागीय अधिकारी श्री. नारायण शिरगावकर साहेब यांनी देखील मॅरेथॉन धावण्याचा आनंद घेतला. मॅरेथॉन मध्ये सर्व सहभागी स्पर्धकांना मा.निवडणूक निर्णय अधिकारी विजया पांगारकर यांचेमार्फत प्रमाणपत्र देऊन तसेच विजेत्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले. यावेळी सर्व उपस्थित नागरिकांनी लोकशाहीवर निष्ठा ठेवून, लोकशाही परंपराचे जतन करण्याचे तसेच नि:पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांची पावित्र्य राखण्याची तसेच कोणत्याही प्रलोभनास अथवा दबावास बळी न पडता मतदान करण्याची शपथ घेतली.
यावेळी धनशैल्य विद्यालय, गीरझनी व किडझी स्कूल, अकलूज या शाळेतील तीन ते पाच वर्षे वयोगटातील मुलांनी मतदान जनजागृतीचे पथनाट्य सादर केले.यामध्ये लहान मुलानमार्फत मतदान करताना कोणत्याही आर्थिक प्रलोभना बळी न पडण्याचे आवाहनाणे उपस्थित भारावून गेले.
या कार्यक्रमाचे आयोजनामध्ये अकलूज नगरपरिषदेचे मा.मुख्याधिकारी व नोडल अधिकारी स्वीप – श्री.दयानंद गोरे साहेब व रोटरी क्लब अकलूज अध्यक्ष श्री.प्रिया नागणे,सचिव मनीष गाकवाड, रोटरी क्लब सराटी डिलाईटचे अध्यक्ष श्री.जगदीश कदम,सचिव महादेव पाटील यांनी नियोजन केले. तसेच अकलूज नगरपरिषद कर्मचारी व रोटरी क्लबचे सदस्य यांनी कार्यक्रम सुरळीत पार पाडण्याकरिता विशेष प्रयत्न केले.