*राज्यात लवकरच पालिका निवडणुकांचं बिगुल, महापालिकेची अंतिम प्रभाग रचना 17 मे रोजी जाहीर होणार
*● ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला 15 दिवसांत निवडणुका जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. ● सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर निवडणूक आयोगाच्या कामाला वेग आला आहे. महापालिकेची अंतिम प्रभाग रचना 17 मे रोजी जाहीर होणार आहे. ● कोरानाचं महासंकट आणि नंतर ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाचा झटका यामुळे लांबलेल्या राज्यातल्या स्थानिक स्वराज्य निवडणुका आता आणखी लांबवता येणार नाहीत. महानगपालिकेच्या निवडणुका आता तातडीनं घ्याव्या लागणार आहेत. ● त्यामुळेच महापालिका निवडणूक संदर्भात राज्य निवडणूक आयोगाचे महत्वाचे आदेश दिले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांच्या सर्व सूचनांचा सखोल अभ्यास करून 14 महानगरपालिकांच्या प्रभाग रचना अंतिम केल्या आहेत*महापालिका निवडणूक संदर्भात राज्य निवडणूक आयोगाचे महत्त्वाचे आदेश*● 11 मे अंतिम प्रभाग रचना काम पूर्ण ● 12 मे पर्यंत प्रभाग रचना अंतिम प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यता पाठवावी ● 17 मे अंतिम प्रभाग रचना अंतिम प्रसिद्ध करावी● 17 मे रोजी अंतिम प्रभाग रचना यादी शासन राज पत्रात अधिसूचना प्रसिद्ध करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहे. ● राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, अमरावती, नवी मुंबई वसई विरार उल्हासनगर कोल्हापूर अकोला सोलापूर नाशिक , पिपंरी चिंचवड, कल्याण डोंबिवली महापालिकांना पत्र पाठवले आहे● महानगर पालिका निवडणुका दोन टप्प्यात होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात ज्या महापालिकांना सहा महिने किंवा एक वर्ष झालं आहे त्यांची निवडणुक घेतली जाणार आहे. नुकतीच मुदत संपलेल्या महापालिकांची निवडणूक दुस-या टप्प्यात होण्याची शक्यता आहे.एकत्रित निवडणूक आल्यानं निवडणुक आयोगावर तसेच शासकीय यंत्रणेवर ताण पडू शकतो त्यामुळे अशी रणनीती आखण्याचं काम सुर आहे