शेततळ्यात पडुन मोहोळ तालुक्यातील शेटफळ येथील तिघा चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यु
मोहोळ – खेळत खेळत शेततळ्याकडे गेलेल्या तीन चिमुकल्यांचा शेततळ्यात पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवार ता. 9 रोजी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास शेटफळ ता. मोहोळ येथे घडली. विनायक भरत निकम वय-11, सिद्धार्थ भरत निकम वय-8, दोघे रा. माचणूर तर कार्तिक मुकेश हिंगमिरे रा. शेटफळ वय-5 अशी मृत्यु झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत.मोहोळ पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत सिद्धार्थ व विनायक यांचे वडील भरत निकम हे मजुरीसाठी शेटफळ येथे आले होते . ते सकाळी मजुरीसाठी दुसऱ्याच्या शेतात गेले होते. तर कार्तिक हा त्या दोघांचा मित्र होता. तिघेही खेळत घराकडे जात होते, रस्त्यातच शेततळे होते. तिघेही शेततळ्याकडे गेल्यानंतर त्यात पडून तिघांचाही मृत्यू झाला. या घटनेची नोंद मोहोळ पोलिसात झाली आहे. अधिक तपास हवलदार आदलिंगे करीत आहेत.दरम्यान या दुर्दैवी घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.