पुलाचे बांधकाम पात्र नसलेल्या कंपनीस? सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कारभाराच्या चौकशीची मागणी.सार्वजनिक बांधकामाच्या भोंगळ कारभाराची चौकशी करणे बाबतच्या निनावी पत्राने खळबळ
अकलूज (रणजित गायकवाड )
माळशिरस तालुक्यातील हनुमाननगर ते कचरेवाडी रस्त्यावरील नारंगी नाला वरील लहान पुलाचे बांधकाम करण्याबाबत कार्यारंभ आदेश निविदेत केलेल्या अटी व शर्थी साठी पात्र नसलेल्या कंपनीस अकलूज सार्वजनिक बांधकाम विभागातील निविदा क्लार्क, लेखापाल, व कार्यकारी अभियंता यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून दिले असून, त्याची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने निविदा सूचना क्र.17सन 2023-24प्रमाणे 11-10-23या निविदा सुचने मधील काम क्र.4हनुमाननगर ते कचरेवाडी रस्ता. ग्रामा 177येथे नारंगी नाला किमी 0/180मध्ये लहान पुलाचे बांधकाम करणे या कामाचा कार्यारंभ आदेश हे माळशिरस तालुक्यातील एका कंट्रक्शन कंपनी ला मिळाले आहे. सदरची कंपनी पात्र नसताना निविदा क्लार्क, लेखापाल व कार्यकारी अभियंता यांनी चुकीच्या पद्धतीने आपल्या पदाचा गैरवापर करून सदर चे काम या कंपनी ला दिले आहे.
तरी या प्रकाराची चौकशी करून फेर निविदा काढण्यात यावी. अशी मागणी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभाग मुंबई चे सचिव, अधीक्षक अभियंता सोलापूर, यांचेकडे केली आहे.सदरचे निनावी पत्र संघर्ष योद्धाला प्राप्त झाले आहे.
चौकट :-
या तक्रारीबाबत कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज यांच्याकडे फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असून मोबाईल नो रिप्लाय आला.