**दसूर गावामध्ये संत तुकाराम महाराज यांच्या बीजेला तुकाराम महाराज यांचीच आरती घेण्यास गावातील माजी पोलीस पाटलाकडून विरोध *
दसूर ता. माळशिरस हे *स्व.आमदार हनुमंत डोळस* यांचं गाव, हे गाव पुर्वीपासून संप्रदायिक गाव म्हणुन या गावाची ओळख आहे. दसूर गाव हे *चातुर्मासे अनवेकर* पंढरपूर या फडावरील परंपरा चालवणारे हे गाव. या गावात सर्व धार्मिक कार्यक्रम नियमित होतात. या *फडाचा संत तुकाराम महाराज* *यांची आरती घेण्यास* *कायम विरोध आहे* . *ज्या दिवसापासून दसूर गाव निर्माण झालं आहे त्या दिवसापासून आजतागायत या गावात संत तुकाराम महाराज यांची आरती घेतली जात नाही.
परंतु संत तुकाराम महाराज यांची बीज. ह्या बीजेचा कार्यक्रम करण्याची परंपरा मागील चार पिढ्यापासून दसूर गावातील संपूर्ण कागदे परिवार व ननवरेपरिवार यांच्याकडे ही बीज करण्याची प्रथा आहे.* आणि हे परिवार ही प्रथा कायम अमलात आणत आहेत.
या *दोन्ही परिवाराचा व संपूर्ण दसूर गावचा संत तुकाराम महाराज यांची आरती घेण्यासाठी पुढाकार असताना गावातील या फडाचे भजनी मंडळ आणि त्यातील प्रमुख दसूर गावचे माजी पोलीस पाटील हरिभाऊ जयवंत पाटील यांचा तुकाराम महाराज यांची आरती घेण्यास तीव्र विरोध आहे.* मागील दिवशी महाराजांची आरती होणे गरजेचे आहे आणि मागील चार दिवसापासून गावातील पुर्ण तरुण वर्ग ही आरती घ्यायची म्हणुन त्यांना सांगतोय अन्यथा वाद होतील असे समजावले होते,
तरीसुद्धा आज बीजेच्या दिवशी सगळ्या संतांच्या आरत्या झाल्यानंतर संत तुकाराम महाराजांची आरती सुरु केली की यांनी भजन संपवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी आरती संपवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी दादा ननवरे यांनी त्यांच्या हातातील माईक ओढून महाराजांची आरती पुर्ण करत असताना पुन्हा एकदा याच माजी पोलीस पाटलांनी ननवरे यांच्या हातुन माईक हिसकावून घेतला आणि तरीपण आम्ही गावातील संपूर्ण लोकांनी संत तुकाराम महाराज यांची आरती पुर्ण केलीच.या *
अश्या विचित्र वागन्यामुळे काहीवेळ गावातील वातावरण भांडणाच्या प्रकाराकडे गेलं होत.अश्या समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या माणसाचा, गावात, संप्रदयात भांडण लावणाऱ्या या व्यक्तीचा, त्यांच्या फडाचा संपूर्ण गावाकऱ्यांनी जाहीर निषेध केला आहे.*ही आरती घेण्यास संपूर्ण दसूर गाव तसेच दासूरचे पोलीस पाटील महेश शिंदे ननवरे परिवारातील दिगंबर ननवरे, सतीश ननवरे, अरुण ननवरे, महावीर ननवरे तसेच कागदे परिवारातील मोहन कागदे, लक्ष्मण कागदे, रणजित कागदे व संपूर्ण कागदे परिवाराने सहकार्य केले.