अखंड मराठा समाजाकडून माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मराठा समाजाची दिशा ठरवण्यासाठी 4नोव्हेंबर रोजी निर्णायक बैठक आयोजित..
🚩 माळशिरस प्रतिनिधी. रणजितदादा गायकवाड
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार 254 माळशिरस विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा विचार विनिमय करण्यासाठी सोमवार दिनांक 4 नोव्हेंबर रोजी सकाळी 8.30 वा.तालुक्यातील सर्व मराठा बांधवांची अकलूज येथे अन्नपूर्णा सांस्कृतिक भवन, प्रतापसिंह चौक, शिवतेजनगर ,धवलनगर रोड, अकलूज येथे महत्वपूर्ण बैठक आयोजित केली आहे, या बैठकीत महत्वाची चर्चा होणार आहे . सर्वस्वी निर्णय घेण्याचा अधिकार संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना असणार आहे
. या बैठकीतील निर्णय आपल्या समाजाच्या भविष्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असल्याने या बैठकीला समाजातील जास्तीत जास्त बांधवांची उपस्थिती अपेक्षित आहे .बैठक वेळेवर सुरू होणार आहे सर्वांनी वेळेवर उपस्थित रहावे.
आसे आवाहन अखंड मराठा समाज माळशिरस तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे