*विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षण विरोधकांचा सुफडासाफ करा.*
मराठा समाजाला 50%च्या आत ओबीसी मधून हक्काचे आरक्षण मिळावे म्हणून सध्या सर्वत्र आंदोलन, उपोषण सुरु आहे.आजपर्यंत आपण शांततेत 58मोर्चे काढले आहेत. या सर्व ठिकाणी पोलीस बंदोबस्त नव्हता.
मात्र जालना जिल्ह्यातील मनोज जरांगे पाटील यांनी शांततेत लोकशाही मार्गाने आंदोलन सुरु केले. या आंदोलनात लाखो बांधव, महिला भगिनी देखील सामील झाल्या होत्या.मात्र या आंदोलनाला गालबोट लागले. पोलिसांनी वरिष्ठ मंडळी यांच्या आदेशानुसार अमानुष लाठी चार्ज केला. अश्रू धुरांच्या नळकांड्या फोडल्या. हवेत गोळीबार केला. माता भगिनींची डोकी फुटली. अनेक बांधव जखमी झाले. का सामील झाले होते. हे नागरिक. यांना कोणीही पैसे देऊन गर्दी जमविण्यासाठी बोलावले नव्हते.
हे सर्व आले होते. ते आपल्याला आणि आपल्या भावी पिढीसाठी आरक्षण मिळावे म्हणून. आपल्या मुलांना पुढील शिक्षणासाठी आरक्षण मिळावे म्हणून. नोकरी मिळावी म्हणून.
कायद्याच्या चौकटी मध्ये बसणारे आरक्षण मागणे हा गुन्हा आहे काय? मग का लाठी चार्ज केला. कोणाच्या सांगण्यावरून केला. कोण आहे. याचा खरा सूत्रधार?हे सर्व घडल्यानंतर याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्र राज्यात उमटले. सर्वत्र याचा निषेध होत आहे.
पावसाच्या पाण्याने नदीला जेव्हढे पाणी आले नाही. ते आंदोलनात माता भगिनी, नागरिक यांची फुटलेली डोकी पाहून अनेक बांधवाच्या डोळ्यातून पाणी आले.का घडले असे. याचा मात्र कोणीच गांभीर्याने विचार करताना दिसत नाही.अनेक बांधवानी आपल्या परीने याचा निषेध व्यक्त केला. जिल्हा, तालुका, गाव बंद करून निषेध व्यक्त केला. गेवराई येथील फुलंब्री येथील सरपंच मंगेश साबळे यांनी तर आपली स्वतःची नवी कोरी फोर व्हीलर स्वतःच जाळून याचा निषेध व्यक्त केला. ठिक ठिकाणी निषेध सभा घेण्यात आल्या.
परंतु या निमित्ताने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी मराठेतर अनेक बांधवानी आपला पाठींबा दिला. त्यात ओबीसी बांधव सुद्धा आहेत. तसेच काही मुस्लिम बांधव सुद्धा आहेत. मुस्लिम बांधव आपल्या रमजान या सणाला हिंदू बांधवाना आवर्जून बोलवितात. हिंदू बांधव सुद्धा दीपावली सणाला आपल्या मुस्लिम मित्रांना आवर्जून बोलवितात. एकमेकांच्या उत्सवाच्या प्रसंगी सामील होतात.
आजकाल आपल्या कडे एक नवीन फॅड आले आहे. दिसला मराठा की कर ऍट्रॉसिटी. जर मराठा बांधव यांनी तुमच्यावर खरंच अन्याय केला असेल. तर तुम्ही जरूर गुन्हा दाखल करा. परंतु किरकोळ कारणावरून तुम्ही वेठीला धरू नका. बर याला साक्षीदार कोण असतो. तर मराठा. मराठा बांधव यांनी देखील साक्षीदार होताना खरेच अन्याय झाला आहे का? याची शहानिशा करून व्हावे. असे मला प्रामाणिकपणे वाटते.
वास्तविक पाहता,आपल्या सर्वांना आपल्या भावी पिढीसाठी आरक्षण मागणे गरजेचे आहे.मग मराठा समाजाने आरक्षण मागितले तर तो गुन्हा आहे काय? आरक्षण नसल्याने अनेक अडचणी ला तोंड द्यावे लागत आहे. गुणवंत्ता असून सुद्धा आरक्षण नसल्यामुळे आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे पुढील शिक्षण घेता येत नाही. नोकरी मिळत नाही. आपल्या मित्रांना 40%,50%गुण मिळाले तरी त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रवेश मिळतो. परंतु 90ते 95%गुण मिळून सुद्धा मराठा समाजाला केवळ आरक्षण नसल्याने पुढील शिक्षण घेता येत नाही. नोकरी मिळत नाही.
उच्च न्यायालय यांनी सुद्धा मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण का दिले नाही. असे राज्य सरकारला विचारले आहे.मुळात राज्य सरकारची मानसिकताच नाही. आरक्षण देण्यासाठी.एका रात्रीत सरकार बदलू शकतं, सकाळी जनता झोपेत असताना तुम्ही 5वाजता शपथ घेऊ शकता, रविवारी सरकारी सुट्टी असताना शपथ घेऊ शकता,2मुख्यमंत्री करू शकता, सत्तेसाठी सर्व पक्ष एकत्र येऊ शकता,तर मग तुम्ही मराठ्यांना 50%च्या आत ओबीसी मधून आरक्षण का देऊ शकत नाही.
तुम्हाला निवडून यायला मराठ्यांची एकगठ्ठा मते लागतात. सीमेवर लढायला मराठे लागतात. धर्म रक्षणासाठी लागतात. तुमच्या सभेला यायला मराठे लागतात. निवडणुकीत घरच्या भाकरी खाऊन तुमचा प्रचार करायला मराठे लागतात.मग आरक्षण द्यायला का नको?
सध्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मराठा, उप मुख्यमंत्री मराठा, सर्वाधिक आमदार, खासदार मराठा. तरीही मराठयावर ही वेळ यावी. ही खूप मोठी शोकांतिका आहे.
मराठा समाजातील अनेकांच्या शिक्षण संस्था आहेत. उदयोग धंदे आहेत. या सर्वांनी जर मराठा विद्यार्थी यांना फित सवलत दिली तर अनेक विद्यार्थी पुढे जातील. ज्यांचे मोठं मोठे उद्योग आहेत त्यांनी नोकऱ्या दिल्या तर काय हरकत आहे?
महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या 11कोटी पेक्षाही अधीक आहे. यात साडे चार कोटी म्हणजेच 32%मराठा बांधव आहेत.कर्नाटक मध्ये 17%लिंगायत समाजाने आपल्या एकिच्या बळावर सरकार पाडले.मग मराठा समाज तर 32%आहे.2024मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठा समाज काय करू शकतो याची चुणूक सर्वांनी पाहिली आहे.
आता विधानसभा निवडणुका होत आहेत.या निवडणुकीत मराठा बांधव काय करू शकतो. हे दाखविण्याची वेळ आली आहे.रात्र वैऱ्याची आहे. वेळीच सावध व्हा. आता आपण एक होऊन मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या ना त्यांची जागा दाखवून द्यायला हवी.
विधानसभा निवडणुकीत सकल मराठा समाजाचे उमेदवार राज्यातील काही ठिकाणी उभा करायचे नियोजन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केले होते. परंतु इच्छुकां ची संख्या जास्त होती. शिवाय मित्र पक्षांनी ऐनवेळी उमेदवारची यादी न दिल्याने निवडणुकीतून नाईलाजाने माघार घ्यावी लागली.असे असले तरी विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाची मते निर्णायक ठरणार आहेत. एव्हढे मात्र निश्चित.
मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा अनेक मतदारसंघात सुफडासाफ होणार आहे.सध्या मराठा बांधव विखूरला गेला आहे. अनेक पक्ष, संघटना यात गुरफटला आहे. गरज आहे. ती सर्वांनी एकत्र येऊन निर्णय घेण्याची.
आज महाराष्ट्र राज्यातील इतर काही समाजातील बांधव यांना सुद्धा आरक्षण ची गरज आहे. त्यांनाही आरक्षण मिळायलाच पाहिजे. ज्या समाजाला खरेच आरक्षण ची गरज आहे. अशा सर्व जाती मधील सर्वांनी आपलेच बांधव आहेत. असे समजून सर्वांनी एकत्रित येऊन इतर जातीतील आपल्या बांधवाना पाठिंबा दिला. तर सर्वांना आरक्षण मिळेल. असे मला वाटते. गरज आहे ती सर्वांनी एकत्रित येऊन निर्णय घेण्याची.
सगळे नेते सगळे पक्ष स्वार्थी असतात. त्यांना समाजाचे काही देण घेणे नाही. सर्वानी आपापले नेते पक्ष घरी ठेवून एकत्र येण्याची गरज आहे. अजून पण आपला समाज ह्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे. सर्व नेते केवळ मराठा समाजाच्या एकगठ्ठा मतदार यांचा वापर करून घेत आहेत. हे आपल्या लक्षात कधी येणार?सगळे नेते सगळे पक्ष आपल्या वर अवलंबून आहेत हे त्यांना दाखवून देण्याची वेळ आली आहे.
जो पक्ष विद्यमान खासदार, आमदार, मराठा समाजाला 50%च्या आत ओबीसी मधून आरक्षण मिळण्यासाठी पाठींबा देईल, तसेच जो इच्छुक उमेदवार आहे. तो पाठिंबा देईल तोच निवडून येईल. अन्यथा मराठा बांधव काय करू शकतो. हे संपूर्ण महाराष्ट्र पाहिल.
आपल्या सदसद विवेक बुद्धीला स्मरून सर्वांनी अवश्य मतदान करा.परंतु,मतदान करीत असताना मराठा आरक्षणा ला ज्यांनी विरोध केला. त्यांचा सुफडासाफ करा.
गणेश लक्ष्मण जाधव. स्वाभिमानी मराठा महासंघ.मानव सुरक्षा सेवा समिती.सोलापूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख.मराठा समाजसेवक.पत्रकार. अकलूज.7841847458.