आंबेडकरवादी पार्टी ऑफ इंडिया चे अध्यक्ष विजय मानकर व डॉ बाबासाहेब आंबेडकर~~~~~~~~~~~~~~~~~~ऍड अविनाश टी काले , अकलूज ता माळशिरस , जिल्हा सोलापूरमो क्रमांक 9960178213~~~~~~~~~~~~~~~~~~ नागपूर येथील शासकीय तंत्रनिकेतन विभाग प्रमुख (अणू विद्युत व दूरसंचरन) चे विजय मानकर यांनी प बंगाल कलकत्ता येथील 1955साली स्थापित झालेल्या बंगाल टेक्निकल इन्स्टिट्यूट या देशातील 4थ्या मानांकनात असलेल्या व जीचे नाव सध्या जाधवपुर विद्यापीठ असे आहे तेथून त्यांनी 2009साली पदवी प्राप्त केली मानकर हे फक्त आडनाव नसून ती आदिवासी जनजाती मधील एका जातीचे नाव आहे , आणि नागपूर मध्ये ते स्थाईक झाल्या नंतर त्यांनी आंबेडकर वादी पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली व त्याचे ते संस्थापक अध्यक्ष आजचे घडीला आहेत 4 दिवसापूर्वी त्यांनी विवादास्पद टीपंन्नी केलेले व्हिडिओ कॉलिंग रेकॉर्ड ची पोस्ट समाज माध्यमावर प्रा विलास खरात यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर हे विद्वान होते असे मी मानत नाही असं वक्तव्य विजय मानकर यांनी केलेली पोस्ट फिरत राहिली फेसबुक वर आमचे मित्र डॉ कुमार लोंढे यांची विजय मानकर यांचा निषेध करणारी पोस्ट माझे वाचनात आली , त्यावर लगेच व्यक्त झालो नाही याचे कारण विजय मानकर नेमके काय म्हणाले?आणि त्यांचा निषेध का केला आहे याची कोणतीही कल्पना त्यांची पोस्ट पाहून येत नव्हती ,मी अंधानुकरण करत त्यास लाईक करणे किंवा पुढे शेअर करणे टाळले , याचे कारण मला कुणी तरी प्रश्न विचारला असता की विजय मानकर काय म्हणाले?त्याचे उत्तर मला माहित नाही ते डॉ कुमार लोंढे यांना माहीत आहे तर ते बेजबादारपणाचे ठरले असते म्हणून ती लिंक मी मागवली आणि समग्र त्यांचे म्हणणे ऐकून घेतले त्यात भारतातील सर्वाधिक शिक्षित असल्याचा दावा त्यांनी केलाच आहे परंतु तो करत असताना जाणीवपुर्वक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मी जागतिक दर्जाचे विद्वान मानत नाही , ते अर्थ तज् व घटना तज्ञ असल्याचे ही मानत नाही , आणि त्यांनी केलेल्या घटनात्मक चुकाचे परिणाम म्हणून आम्हाला अडथळे निर्माण झालेले आहेत अशी अनेक वक्तव्य केली आहेत आरक्षण निती बद्दल ही त्यांनी कांहीं प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत , व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे हे मॉडेल ही पाच्छीमात्य कल्पनेची उसन वारी आहे , इतकेच काय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेला स्टेट सोसियालिझम् (राज्य समाजवाद)ही लेनिन स्टॅलिन यांची उसन वारी आहे आणि त्यांच्या कल्पना आपल्या कल्पना म्हणून त्यांनी मांडल्या आहेत त्यांनी स्वीकारलेला बौद्ध धम्म हा क्रांतिकारी , विज्ञानवादी नसून तो आजच्या विज्ञानाशी सुसंगत नाही , आणि त्यात ही अनेक अंधश्रध्दा असल्याने ,(मुळात व्यक्तीचे बुध्द असणे)हीच एक अंध श्रध्दा असून त्यामुळे जी बौद्ध राष्ट्र आहेत त्यातील लोक जागतिक पातळीवर चमकदार कामगिरी करू शकलेली नाहीत जपान , श्रीलंका , इत्यादी , या उलट चीन मधील विद्यार्थी विज्ञान आणि तंत्रज्ञान गणित यात जागतिक पातळीवर अव्वल दर्जाचे आहेत अशा अनेक बाबी ची मांडणी करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना छोटे दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे पण त्यांनी असा प्रयत्न का केला? याचे उत्तर शोधावे लागते , तेंव्हा त्यांची पुढील दिशा आपणास आकलित होते , फक्त त्यांचा निषेध केल्याने , त्यांना शिवीगाळ केल्याने या वक्तव्याचे प्रयोजन काय असावे हे ही समजणार नाही आंबेडकरी चळवळीचे अनेक विद्वान आज देशभरात आहेत , आणि ते वैचारिक मांडणी करण्यास सक्षम व अधिकार वाणी चे आहेत असे मी मानतो , मी या प्रवर्गात बसत नाही , आणि विजय मानकर यांचे सारखा मी विद्वान आहे असा दावा करण्या इतका मी मोठा उच्च शिक्षित नाही पण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रति , त्यांनी समाजाला आपले आयुष्य समर्पित करून दिलेल्या लढ्या प्रति माझ्या मनात नितांत आदर आणि श्रध्दा ही आहे आणि ते आमच्या गुलामीचे बंध तोडून आम्हाला मुक्त स्वांतत्र्य बहाल करणारे मुक्ती दाते आहेत अशी माझी व माझ्या समाजाची भावना आहे विजय मानकर यांच्या कांहीं मुलाखती मी आवर्जून पाहिल्या , त्यातील त्यांच्या कथनाचा मतितार्थ ही पाहिला एका कार्यक्रमात आयोजकांनी त्यांची परवानगी न घेता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला किंवा पुतळ्याला हार घालण्याचा प्रोग्राम तयार केला , याला त्यांनी नकार दिला , व ही बाब कोणाच्या परवानगीने पक्षाच्या कार्यक्रमात घुसडली?याचा जाब विचारला , यातून विजय मानकर यांच्या प्रभावात आलेले एस सी प्रवर्गातील त्यांचे अनुयायी दुखावले गेले , व त्या मुळे हे संभाषण घडले , जर पुतळ्याला किंवा प्रतिमेला त्यांची मर्जी किंवा आस्था म्हणून हार घातला गेला तर उद्या कोणी मंदिरात किंवा मशिदीत ही मला घेऊन जातील कारण त्यांच्या ही आस्था किंवा श्रध्दा आहेत म्हणून ते मी करायचे का?असा प्रश्न ते विचारतात आंबेडकरवादी पार्टीत राहायचे असेल तर त्यांनी हे नियम पाळले च पाहिजेत अन्यथा त्यांनी पार्टीच्या बाहेर जावे , अशी भूमिका ही त्यांनी घेतली भारतातील सांस्कृतिक इतिहास हा श्रमन (बौद्ध व जैन ) म्हणजे 2500वर्ष किंवा त्या अगोदर आर्य आल्या नंतर म्हणजे 5000वर्ष पासून च नाही तर तो 50,000वर्षा पूर्वीचा आहे , आणि तो द्रविडीयन म्हणजे आदिवासी समाजाचा आहे अशी ते मांडणी करतात त्या साठी ते इंडीनियस हा शब्द प्रयोग करतात , शेड्युल्ड ट्राईब हा शब्दप्रयोग नाकारतात भारतात प्रचलित असलेल्या आजच्या भाषा ज्यात हिंदी , मराठी , संस्कृत , पाली या सर्व भाषा या आर्यन संस्कृती समवेत आलेल्या आहेत , आणि आदिवासी लोक ज्या भाषा बोलतात त्या मूळ भारतीय भाषा आहेत , वर्ण व्यवस्थेतील सर्व लोक हे मूळचे इथले नाहीत काळे, गोरे , ब्राम्हण , क्षत्रिय , वैश्य आणि शूद्र , हे तिकडचे आहेत व ही बाब विज्ञानाने सिद्ध केली आहे असे त्यांचे म्हणणे आहे म्हणजेच याचा अर्थ दुसऱ्या बाजूने असा होतो की , आंबेडकरी चळवळ एस सी ,एस टी , व्हीं जे एन टी, ओबीसी , अश्या सर्व घटकांचा विचार करते आणि त्यांना संघटित रुपात उभी करू पाहते , वैदिक विरुद्ध अवैदिक परंपरा असे लढाईचे स्वरूप देऊन 2500वर्ष पूर्वीच्या बौद्ध धम्मा त त्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न करत असताना आणि राजेंद्र गौतम पाल यांचे व राज रत्न आंबेडकर यांच्या संयुक्त प्रयत्नातून जो धम्म दीक्षा कार्यक्रम लखनौ येथे पार पडला त्या नंतर विजय मानकर यांचे हे स्टेटमेंट आलेले आहे , आणि त्या आधारे मांडणी करून आदिवासी समाजाला , भटक्या विमुक्त यांना या प्रक्रियेपासून लांब घेऊन जात आहेत सद्य स्थितीत असलेला सनातनी सांस्कृतिक हिंदुत्व वाद याचा ते ही विरोध करतात , भारतीय राज्य घटनेतील कमजोर बाबी हेरून त्या आधारे या हिंदू राष्ट्रवादाची उभारणी केली जात आहे , व भारतीय राज्य घटना यास रोखू शकत नाही ,बाबरी मस्जिद प्रकरणी निकाल देताना सुप्रीम कोर्टाने हा निकाल आस्थेच्या आधारे देत आहोत असे म्हणले आहे याचा आधार घेऊन ते म्हणाले की फ्रेंच राज्यक्रांती नंतर 1905मध्ये घटनात्मक तरतूद करून राज्य आणि चर्च यांचे वेगवगळे पण नीच्छित करण्यात आले जर्मनी मधे घटनेत स्पष्ट पने लिहिले राज्याचा कोणताही धर्म नसेल भारतात मात्र जो सेक्युलर शब्द प्रयोग आहे तो राज्य घटनेत समाविष्ट च नव्हता , 1976साली तो प्रिंअबल मध्ये घालण्यात आला न्यायालयाने निर्णय देताना नैतिकतेने तो द्यावा असे मानले गेले , परंतु ज्युडीसियल अकाउटीबिलिटी ठेवली गेली नाही त्याचा हा परिणाम आहे त्यामुळे तो निकाल कायदेशीर की बेकायदेशीर हे स्पष्ट करता येत नाहीह्युमन राईट्स हा शब्दप्रयोग ही राज्य घटनेत नाही , सेप्रेशन ऑफ पॉवर आणि चेक एन बॅलन्स याची तरतूद त्यात नाही जागतिक पातळीवर उदयास आलेला उदारमतवाद आणि नव राष्ट्रवाद यावरील उपाय योजना राज्य घटनेत सापडत नाहीत ब्रिटन ने 2010साली त्यांच्या घटनेत सुधारणा घडवून आणली , ट्रंप यांची इच्छा असून ही अमेरिकन घटनेला ते दाबू शकले नाहीत पण बहुमत इथे घटनेवर आरूढ करण्यात भाजपा यशस्वी झाला संस्कृतीचे ज्ञान असणे आणि संस्कृती मध्ये जगणे यात फरक असतो , पुरातन संस्कृतीत जगाल तर तुम्ही पुढे कधीच जाऊ शकणार नाही हिंदुत्व वादाला टक्कर देण्याची क्षमता बौद्ध धम्मात नाही ती क्षमता फक्त मानवतावादी , प्रकृतीवादी , समानता वादी असलेल्या द्रविडीयन म्हणजेच आदिवासी संस्कृतीत आहे अशी मांडणी ते करतात मी हळू हळू आंबेडकर वाद बाजूला ठेवणार होतो असे त्यांचे विधान हेच दर्शवते की आंबेडकरी चळवळीशी असलेले नाते ते संपवू पाहत आहेत ,आदिवासी , भटके विमुक्त , यांचा कॅनव्हास त्यांना खुणावत आहे , मागास वर्गीय समाजाचे जात मागासलेपण (अस्पृश्य तेचा)बोजा त्यांना नकोसा आहे , यातून त्यांनी कृतघ्न तेने डॉ बाबासाहेब आंबेडकरांना नकार दिलेला आहे , वॉल्टेअर, एडिसन , गटे, कार्ल मार्क्स, असे अनेक विद्वान होऊन गेले त्यांचे तुलनेत डॉ बाबासाहेब आंबेडकर कोठेच नाहीत , 100अर्थ तज्ञांचे यादीत ही ते कोठेच नाहीत अशी वाक्य ते मुद्दाम हुन पेरतात , जगाच्या पाठीवर अनेक विद्वान होते आणि असतील ही , परंतु आपल्या उपेक्षित समाजाच्या उद्धारासाठी आपले आयुष्य , तन मन , धन, वेळ , आपले कुटुंब , आपली मुले , आपले सुख त्यागून जगणारे महामानव फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकर च होते व आहेत व राहणार , भाजपा चे आर्थिक पाठबळ घेऊन मनुवादी शक्ती ला सोबत घेऊन आदिवासींना व्यापक जन चळवळी पासून तोडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे व हीच बाब अधोरेखित होते म्हणून त्यांची विद्वत्ता ही सर्व नाशी आहे , अहितकारी आहे म्हणून त्यांचा जाहीर निषेध करत आहे जय भीम