महाराष्ट्र केसरी स्पर्धेपूर्वी राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेची(नाडा) डोपिंग चाचणी अनिवार्य करावी अथवा डोपिंग चाचणी शिवाय सुरू होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन थांबवण्यात यावे.यासाठी धैर्यशील मोहिते पाटील यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचेकडे मेल द्वारे मागणी
अकलूज (प्रतिनिधी ) महाराष्ट्र केसरी स्पर्धेपूर्वी राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेची(नाडा) डोपिंग चाचणी अनिवार्य करावी अथवा डोपिंग चाचणी शिवाय सुरू होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन थांबवण्यात यावे.यासाठी सोलापूर जिल्हा भाजपा चे संघटन महामंत्री तथा अध्यक्ष शिवरत्न कुस्ती प्रशिक्षण केंद्र, अकलूज चे धैर्यशिल राजसिंह मोहिते-पाटील यांनी मेल द्वारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे मेल द्वारे मागणी केली आहे. तसेच सदर निवेदन महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन,महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद चे अध्यक्ष रामदास तडस,महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद चे अस्थायी समिती चे मुरलीधर मोहोळ यांना पाठविण्यात आले आहे.सदर निवेदनात असे सांगितले आहे की क्रीडा प्रकारांमध्ये विशेषतः कुस्ती प्रकारात मेफेन टेरेमिन सल्फेट इंजेक्शनचा वापर होवू लागला आहे. अवैध पद्धतीने या इंजेक्शनची विक्री केली जात असल्याचे निदर्शनास येताच मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब व सोलापूर ड्रग इन्स्पेक्टर यांच्याकडे याबाबत निवेदन दिले होते.त्या अनुषंगाने सोलापुर जिल्हा अन्न आणि औषध प्रशासनाने एक मोठी कारवाई केली आहे.मेफेन टरमाईन या औषधाची अवैधपणे विक्री केल्याने माळशिरस तालुक्यातील एकाच दुकानातून तब्बल ८००० वाईल्सची विकल्याचे तपासात पुढे आले आहे. या कारवाईमुळे महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या कुस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल जात आहे त्याचं कारण आहे की, अवैधपणे विक्री करण्यात आलेले मेफेन टरमाईन हे पैलवानांनाच विकल्याचं पोलिस तपासात समोर येत आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर असताना झालेली ही कारवाई पाहता,कुस्तीतील डोपिंगची कीड महाराष्ट्र केसरीपर्यंत पोहोचली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. डोपिंग बाबत प्रतिबंधात्मक उपाय म्हणून महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सामिल होण्यापूर्वीच पैलवानांची राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थे मार्फत(नाडा) डोपिंग टेस्ट करने बंधनकारक करण्यात यावी अथवा डोपिंग चाचणी शिवाय सुरू होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन थांबण्यात यावे अशी विनंती सोलापूर जिल्हा भाजपा चे संघटन महामंत्री तथा अध्यक्ष शिवरत्न कुस्ती प्रशिक्षण केंद्र, अकलूज चे धैर्यशिल राजसिंह मोहिते-पाटील यांनी मेल द्वारे केली आहे.