सासरच्या छळाला कंटाळून संग्रामनगर (तांबोळी वसाहत )येथील महिलेची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या.नवरा, सासू, नणंद यांचेवर गुन्हा दाखल अकलूज (प्रतिनिधी )लग्नामध्ये झालेला खर्च माहेरून घेऊन ये.असे म्हणून वेळोवेळी उपाशी ठेवून शिविगाळी-दमदाटी करून हाताने लाथा बुक्क्यांनी मारहाण करून प्रसंगी डोक्याचे केस ओढून तिला शारीरिक तसेच मानसिक त्रास देऊन अफिफा सादिक तांबोळी (वय 26 वर्षे)राहणार -तांबोळी वसाहत,संग्राम नगर. तालुका- माळशिरस हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने तिने 6जानेवारी रोजी तिचे राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.यासंदर्भात उत्तर कसबा, सोलापूर. येथील रिक्षा चालक, वाजिद नयिम तांबोळी( वय वर्षे 32 ) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून, अकलूज पोलीस ठाणे येथे गु. र.नंबर 19 2023 भादवि कलम 306 498(A ) 323 504 506 34 अन्वये सायरा रहीम तांबोळी,नवरा -सादिक रहीम तांबोळी दोघे रा. तांबोळी वसाहत संग्राम नगर तालुका माळशिरस.नणंद साजिया (पूर्ण नाव माहित नाही) राहणार बार्शी तालुका बार्शी सुमय्या (पूर्ण नाव माहित नाही) राहणार मायणी तालुका खटाव जिल्हा सातारा.यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात अधीक माहिती अशी की,.01 आक्टोंबर 2017 पासून ते 06/01/2023 रोजी दुपारी 12.50 पर्यंत वेळोवेळी राहते घरी तांबोळी वसाहत माळशिरस जिल्हा सोलापूर येथे फिर्यादीची बहीण अफिफा सादिक तांबोळी वय 26 वर्षे हिस आरोपी मजकूर 1)सायरा रहीम तांबोळी 2)नवरा सादिक रहीम तांबोळी 3)नणंद साजिया व सुमया असे यांनी यातील मयतास लग्न झाल्यानंतर ऑक्टोंबर 2017 पासून ते 06/01/ 2023 रोजी दुपारी 12/50 वाजेपर्यंत तिचे राहते घरी तांबोळी नगर संग्राम नगर येथे वरील आरोपी यांनी यातील मयत हिस तुझ्या लग्नामध्ये झालेला खर्च माहेरून घेऊन ये.असे म्हणून वेळोवेळी उपाशी ठेवून शिविगाळी-दमदाटी करून हाताने लाथा बुक्क्यांनी मारहाण करून प्रसंगी डोक्याचे केस ओढून तिला शारीरिक तसेच मानसिक त्रास देऊन तीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने तिने तिचे राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अशी फिर्याद दिली आहे.पुढील तपास सपोनी जाधव हे करीत आहेत.