*राष्ट्रीय सेवा योजनाच्या उपक्रमातून युवकांनी आपला व्यक्तीमत्व विकास घडवावा.पो.नि.दिपरतन गायकवाड*
अकलूज दि.६ (केदार लोहकरे ) अकलूजच्या शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनाचे विशेष श्रमसंस्कार शिबीर मौजे चाकोरे (ता.माळशिरस) येथे आजपासून सुरुवात झाली आहे.त्याचे उदघाटन माळशिरस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांचे हस्ते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील व आक्कासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजनाने करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय बागडे होते. पो.नि.गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की,काॅलेजच्या जीवनात युवकांनी अभ्यासाबरोबर विविध उपक्रमात सहभागी होऊन आपला सर्वांगीण विकास व स्वतःचे व्यक्तीमत्व विकास साधावा असे मुलांना आवाहन केले. यावेळी चाकोरे गावचे सरपंच नवनाथ जाधव,उपसरपंच सचिन कचरे,माजी सरपंच चंद्रकांत शिंदे ग्रामपंचायत सदस्य सुरेश पाटील, तिरवंडी गावचे सरपंच नानासाहेब वाघमोडे,रोटरी क्लबचे अध्यक्ष दिपक फडे,सचिव केतन बोरावके,मोहन गायकवाड,जि.प.शाळा मुख्याध्यापक बाळासाहेब शिंदे,दादा आरडे,किरण भांगे,धुळदेव वाघमोडे,बीट अंमलदार बोराटे व गायकवाड,यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,अकलूज केंद्राचे समन्वयक डॉ.बाळासाहेब मुळीक सर, राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय समन्वयक डॉ.चंकेश्वर लोंढे,कार्यक्रमाधिकारी डॉ.दत्तात्रय मगर,डॉ.सज्जन पवार,डॉ.सविता सातपुते, प्रा.विजयकुमार शिंदे,कनिष्ठ महाविद्यालय विभागप्रमुख राजकुमार इंगोले,कनिष्ठ महाविद्यालय कार्यक्रमाधिकारी प्रा.बलभिम काकुळे ,खराडे सर,वाघ सर,मिले मॅडम,नलवडे सर इ.उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ.मगर सर,आभार डॉ.सज्जन पवार व सूत्रसंचालन अनिल पराडे सर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवका व स्वयंसेविका परिश्रम घेतले.सायंकाळी राहुलबापू वाघमोडे यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलीत करून स्वयंसेवकांनी गावातून मशालफेरी काढली.



