माढा लोकसभाचे विद्यमान खासदार यांना माजी खासदार करा.
अकलूज (प्रतिनिधी )माढा लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना भाजपा ने पुन्हा उमेदवारी देऊन माढा लोकसभा मतदारसंघात उतरविले आहे.माढा लोकसभा मतदार संघातील सात तालुक्यातील मतदारांमध्ये मात्र या उमेदवारी बद्दल तीव्र विरोध केला जात आहे.
माढा रणजितसिंह निंबाळकर यांना पाडा. अशा पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.2019ला खासदार यांना निवडून दिल्यापासून ते आम्हाला अद्याप दिसलेच नाहीत. असा अनेक मतदारांच्या भावना आहेत. शिवाय काहींना तर आपले खासदार कोण आहेत? हेच माहित नाही.आपण या मतदार संघासाठी आजपर्यंत एक लाख कोटी विकासनिधी आणला. असे खासदार वारंवार सांगत आहेत. परंतु हा विकासनिधी कोणत्या योजनेतून कोण कोणत्या तालुक्यातील गावात आणला. हे मात्र सांगत नाहीत.
याशिवाय एखाद्या प्रलंबित समस्या संदर्भात खासदारांना निवेदन दिले तर त्याची दखल सुद्धा घेतली जात नाही. त्यांना फोन केला तर ते उचलत सुद्धा नाहीत. त्यामुळे त्यांच्या विषयी मतदार संघात प्रचंड नाराजीचा सुर आहे.
वास्तविक पाहता ऐनवेळी लादलेला उमेदवार म्हणून मागच्या टर्म पासूनच मतदार संघातील नागरिक नाराज आहेत.निवडून आल्यापासून खासदार यांनी ज्या गतीने आणि पद्धतीने केंद्र सरकारच्या योजना मतदार संघातील नागरिकांपर्यंत पोहचवायला हव्या होत्या. त्या पद्धतीने त्या पोहचविल्या नाहीत. ज्या काही योजना आल्या त्याचा लाभ त्यांच्या मर्जीतील कार्यकर्ते यांनाच झाला. परंतु इतरांना मात्र त्याचा लाभ मिळाला नाही.
निवडून आल्यापासून त्यांनी कोणत्याही मतदार बरोबर प्रत्यक्ष संपर्क ठेवला नाही. केवळ आपल्या मर्जीतील नेत्यांच्या गाठी भेटी घेतल्या.रस्तेविकास वगळता केंद्रातील सत्तेचा लाभ मतदार संघातील नागरिकांना कोणत्याही योजना मधून झाला नाही.
याशिवाय मतदारसंघातील अनेक गावात पाणी टंचाई आणि दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. हे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी कोणतेही प्रयत्न केले नाहीत.त्यामुळे त्यांच्या विषयी मतदारसंघात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मतदारांचा हाच संताप 17मार्च रोजी शिवरत्न वर प्रत्ययास आला. मंत्री गिरीश महाजन शिवरत्न वर आले होते त्यावेळी स्वयंस्फुर्तीने जमलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत आपला तीव्र संताप व्यक्त केला त्याची दखल घेत स्वतः मंत्री महोदयांनी कार्यकर्त्यांना शांत करून संयम बाळगण्याबाबत आवाहन केले.
यावेळी विद्यमान खासदार यांना माजी खासदार करा’ ‘फलटण चे पार्सल परत फलटण ला पाठवा. अशा घोषणा देत परीसर दुमदुमून टाकला.