महाराष्ट्रामध्ये कोणतीही एखादी घटना असो अथवा भागातील एखाद्या व्यक्तीवर झालेला अन्याय असो या सर्वांच्या समस्या लगेच सोडवण्यासाठी आपली तत्परता दाखवून लेखणीच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी हक्काचा पत्रकार म्हणून भैय्या खिलारे यांच्याकडे पाहिले जाते.
सर्वसामान्य व्यक्ती असो किंवा प्रशासन असो कोणाच्याही मदतीला तत्परतेने धाव घेणे हा भैय्या खिलारे यांचा जणू स्वभावच आहे. एखाडी घटना घडते ती एकापासून दुसऱ्या पर्यंत पोहोचते त्याला एखाडे माध्यम हवे असते ते माध्यम काळानुसार बदलत गेले, व्यक्तिमार्फत निरोप, लखोटा, खलिता, बंद खोटा, बंद पाकीट चिट्टी, पत्र, लेखी निरोप यातूनच पुढे एखाडी घटना जाहिरपणे सर्वापर्यंत पोहचवण्यासाठी प्रथा सुरू झाली आणि वृत्तपत्राचा जन्म झाला. मोठमोठ्या शहरांमध्ये अशी वृत्तपत्रे छापली जाऊ लागली आणि ती ग्रामीण भागांमध्ये एखाद्या शिक्षित व्यक्तिमार्फत सार्वजनिक वाचली जावू लागली हे वाचण्याचे ठिकाण वेळ ठरले जाऊ लागली यातूनच पुढे वाचनालयाचा जन्म झाला. अनेक वृत्तपत्रे एकाच ठिकाणी येऊ लागले आणि प्रिंट मोडिया ला चांगले दिवस आले पुढे धावत्या जगात आकाशवाणी, रेडिओ यांना चांगले दिवस आले आणि रेडिओवरील बातम्या ऐकण्या कडे लोकांचा कल वाढला. घराघरात रेडिओ हे माहितीचे साधन झाले आहे. साध्य वृत्तपत्रा बरोबरच डिजिटल मीडियाला लोक अधिक पसंत करू लागले त्याही पुढे जाऊन आज मोबाईलच्या जमान्यमध्ये मेसेज ट्टिर फेसबुक व्हाट्सअप याचबरोबरन्यूज पोर्टलचा जमाना सुरू झाला. बदलत्या माध्यमातून बदलत्या जमाना आणि मानसिकता बदलू लागले याचाच फायदा घेत अनेक तरुण प्रिंट मीडिया कडून डिजिटल मीडिया कडे वळले याचाच एक भाग म्हणून मंगळवेढ्याचा सुपुत्र भैय्या खिलारे या क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी बजावत आहेत.