मौजे माळखांबी ता माळशिरस येथील भुमापान क्रमांक ३२४ मधिल खाते नंबर २२३० या क्षेत्रातील जमीन जिल्हा अधिकारी तथा उपसंचालक पुनर्वसन जमिन सोलापूर यांच्या नावे असुन त्या जमिनीवर गोरगरीब जनतेला घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी जिल्हा अधिकारी यांच्याकडे बच्चन साठे यांची मागणी
प्रतिनिधी:- विद्रोही फकिरा न्युज मुख्य संपादक बच्चन साठे
मौजे माळखांबी ता माळशिरस येथील भुमापान क्रमांक ३२४ मधिल खाते क्रमांक २२३० हे क्षेत्र जिल्हा अधिकारी तथा उपसंचालक पुनर्वसन जमिन सोलापूर यांच्या नावे असल्याचे दिसून येत असुन संबंधित जमिनीत बेकायदेशीर वहिवाट घातल्याचे दिसून येत आहे संबंधित जमिनिचा खटला न्यायालयात आहे अशी सुत्रांकडून माहिती मिळत आहे संबंधित क्षेत्रातील बोअरवेल व जमिन वहिवाट घालण्यासाठी न्यायालयाने तसा आदेश दिला आहे याची चौकशी करण संबंधित महसूल अधिकारी यांनी चौकशी करण गरजेचं आहे संबंधित जमिनीत वहिवाट घालणाऱ्या लोकांना कोणत्या अधिकाऱ्यांचा अश्रय मिळाला आहे संबंधित जमीन ही संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर असुन सद्या माळखांबी गावात विसाव्या साठी संत तुकाराम महाराज यांची पालखी थांबते परंतु पारखी सोबत असलेली सर्वं यंत्रणा भाविक भक्त यांना व्यवस्थितपणे जागा उपलब्ध होत नाही पालखी दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने गर्दी होत असते त्यामुळे महिला भगिनींना नाहक शारिरीक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे जिल्हा अधिकारी यांनी संबंधित जमीन ही पालखी विसाव्या साठी अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करावे तसेच माळखांबी गावातील गोरगरीब जनतेला रमाई घरकुल योजना व प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुले मंजूर झाली असुन काही गोर गरीब जणतेला घरकुले बांधन्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने घरकुले माघारी जात असुन लोकांना स्वतंत्र मिळुन सुद्धा उघड्यावर राहण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे तरी जिल्हा अधिकारी तथा उपसंचालक पुनर्वसन जमिन सोलापूर यांच्या नावे असलेली जमीन ही ऐखांद्या व्यक्तीच्या घश्यात घालण्यापेक्षा गोरगरीब जनतेला घरकुले बांधन्यासाठी देण्यात यावी यासाठी न्यायालयात दाद मागितली पाहिजे तरी संबंधित जमिनीत वहिवाट कोणत्या लोकांनी घातली आहे संबंधित जमिनिचा अर्थिक दृष्ट्या व्यवहार झाल्याचे जणतेतून समजले जाते तरी संबंधित जमिनिची सखोलपणे योग्य चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व जिल्हा अधिकारी तथा उपसंचालक पुनर्वसन जमिन सोलापूर ही शासनाची जमिन असुन त्या जमिनिचे मालक शासन प्रतिनिधी असुन ग्राम महसुल अधिकारी, पोलिस पाटील, कोतवाल,मंडल अधिकारी, तहसीलदार सो यांनी याचा पाठपुरावा करणे आवश्यक असुन अंश.या गोष्टिकडे पाहता कुंपणच शेत खात असताना दिसुन येत आहे आंधळ दळतंय अन् कुत्रं पीठ खातय अश्या म्हणी प्रमाणे सद्याची स्थिती आहे जोपर्यंत न्यायालयात निकाल लागत नाही तोपर्यंत संबंधितांना जमिनीत वहिवाट घालण्यासाठी बंदी घालण्यात यायला हवी संबंधित जमिनीत घरकुले बांधन्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील भाविक भक्तांना त्याठिकाणी आरामदायक आसन म्हणून संबंधित जमिनीत व्यवस्था करण्यात यावी जिल्हा अधिकारी तथा उपसंचालक पुनर्वसन जमिन सोलापूर ही अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करावे या मागणीसाठी मा.जिल्हाधिकारी ,मा प्रांत अधिकारी, तहसीलदार सो,मा, गटविकास अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली असुन अद्याप कोणत्याही प्रकारची कार्यवाही केल्याचे दिसून येत नाही तरी संबंधित जमिनीत वहिवाट घालण्यासाठी शासनाच्या प्रतिनिधिचा अश्रय असल्याची शंका नाकारता येत नाही आमच्या निवेदनाचा तातडीन विचार न झाल्यास न्यायालयात दाद मागितली जाणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते बच्चन साठे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले