सोलापूर /प्रतिनिधी भैय्या खिलारे:
गुन्हेगारीच्या क्षेत्रात पहिल्यांदाच पदार्पण केल्यानंतर पहिला गुन्हा पचला म्हणून दुसरा गुन्हा केला दुसरा गुन्हा पचण्यापूर्वीच तिसऱ्या गुन्ह्याच्या तयारीत असलेल्या जालन्यातील सहा तरुणांच्या टोळक्याला सदर बाजार पोलिसांनी पकडले आहे आणि पहिल्या दोन्ही गुन्ह्यात चोरलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे विशेष म्हणजे हे सर्व तरुण 22 वर्षाच्या आतमधील आहेत. त्यापैकीच गुन्हा करण्यासाठी टीप देणारा यश विजय देशमुख वय 20 वर्ष हा नागेवाडी येथील अमृततुल्य चहा येथे काम करत होता आणि त्यानेच उर्वरित पाच जणांना गुन्हा करण्यासाठी टीप दिली होती.जालना शहरातील जुन्या मोंढा भागात घनश्याम भरतराम अग्रवाल या व्यापाऱ्याची दिनांक 27 डिसेंबर रोजी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास दुचाकी अडून त्याच्या हातात रोख रक्कम बारा लाख रुपये असलेली बॅग लुटून नेल्याची घटना घडली होती. हा गुन्हा बदनापूर तालुक्यातील मान देऊळगाव येथील गोपाळ गणेश गायकवाड व सुनील महादू पवार यांनी केले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्या अनुषंगाने या प्रकरणाचा तपास सुरू झाला. तपासा दरम्यान कैलास उर्फ कॉलेज राजू गायकवाड , सचिन उर्फ पोच्चा उर्फ माया हरिश्चंद्र जाधव राहणार जालना, सुमित उर्फ ओम शैलेश डुरे यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्याकडून गुन्ह्यामध्ये वापरलेली मोटरसायकल तसेच सोन्याचे दागिने तपाशीक अधिकारी श्रीमती दिपाली शिंदे यांनी जप्त केले होते .यादरम्यान आणखी एक नाव समोर आलं होतं ते म्हणजे यश विजय देशमुख राहणार शिषटेकडी जालना .याने या गुन्ह्या संदर्भात सर्वांना माहिती दिली होती आणि हा गुन्हा घडवून आणला होता या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्यासह त्यांचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक शैलेश मस्के ,रामप्रसाद रंधे, जगन्नाथ जाधव ,धनाजी कावळे, दुर्गेश गोफणे, गणेश तेजनकर, राहुल कटकम, आदींनी लावला.