वसंतराव काळे विद्यालयात बाजार डे साजरा
वसंतराव काळे विद्यामंदिर चंद्रभागानगर,भाळवणी ता.पंढरपूर येथे विद्यार्थ्यांच्या व्यवहारिक ज्ञानात वाढ होण्याच्या दृष्टीने बाल आनंद मेळावा (बाजार डे) या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन भाळवणीचे सरपंच रणजित जाधव,उपसरपंच नितीन शिंदे,प्रशालेचे सचिव हनमंत जमदाडे , प्रशांत माळवदे, सागर चौगुले यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या बाल आनंद मेळाव्यात पालेभाज्या,पाणीपुरी,वडापाव, भेळ ,चाॅकलेट या बरोबर विविध प्रकारच्या अनेक वस्तु यांचे स्टाॅल विद्यार्थ्यांकडुन लावण्यात आले होते.
या बाल आनंद मेळाव्यात पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन मुलांकडुन खरेदी करुन घेतली व प्रशालेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले व या उपक्रमाचे कौतुक केले.या वेळी प्रशालेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.हा बाल आनंद मेळावा बाजार डे अतिशय आनंदाच्या वातावरणात पार पडला.
सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रशालेचे जेष्ठ सहशिक्षक एस.एम.चौगुले यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक एस.एल.काळे सर व सर्व सहशिक्षक सहशिक्षिका यांनी परिश्रम घेतले.