सहाय्यक कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र2 यांना सामाजिक कल्याण एवं मानव संघानी निवेदनाद्वारे दिला आंदोलनाचा इशारा जुने बस स्टॅन्ड ते यशवंत नगर रस्ता व जयसिंह चौक ते डॉ आंबेडकर चौक नवीन डांबरे रस्ता करण्याची निवेदनाद्वारे किली मागणी निवेदनात असे म्हणण्यात आले आहे की अकलूज शहरातील (जुने एसटी स्टँड ते यशवंत नगर) व (जयसिंह चौक ते डॉ आंबेडकर चौक या दोन्हीही) रस्त्याची फार बिकट अवस्था झाल्याने नागरिकांना मोठ मोठ्या खड्ड्याच्या समस्याला समोर जावा लागत आहे मागील किती काळापासून कार्यक्रमाच्या निमित्ताने देशाचे व राज्याचे नेते अकलूज शहरातील दौऱ्यावरती येणार म्हटल्यानंतर आपल्या बांधकाम विभागाला खडबडून जाग येते आणि डांबरी रस्त्याला पडलेल्या खड्ड्याला माती मुरूम टाकून मलमपट्टी कितीतरी वेळा करण्यात आली आहे देशाचे व राज्याचे नेते दौरा करून गेल्यानंतर बांधकाम विभाग टाकलेल्या मुरमाच्या मातीच्या धुळीच्या त्रासाला अकलुज शहरामधल्या जनतेला समोर जावा लागत आहे अनेक वर्षापासून हे दोन्ही रस्ता डांबरीकरण नवीन होण्यासाठी बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहेत तरी आपण तात्काळ (जुने स्टॅन्ड ते यशवंत नगर रस्ता) व जयसिंह चौक ते डॉ आंबेडकर चौक या दोन्हीही रस्त्याचे नवीन डांबरी करण करावे आपल्याकडून या दोन्हीही रस्त्याचे काम वेळेत न चालू झाल्यास सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाच्या वतीने आपल्या कार्यालय समोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी ही निवेद राष्ट्रीय अध्यक्ष राजेश कुंभार व राष्ट्रीय उपाध्यक्ष तेजस भाई परमार यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले यावेळी उपस्थित पश्चिम भारत अध्यक्ष अमोल बाळासाहेब माने तालुका अध्यक्ष तानाजी वायदंडे तालुका उपाध्यक्ष विष्णू केंगार संग्राम नगर विभाग अध्यक्ष रोहित टेके मारूती तिकोटे रोहित घोसाळकर तालुका महिला अध्यक्ष सौ अश्विनी ताई पांढरे पुणे महिला अध्यक्ष सौ शुभांगी ताई मोरे तालुका महिला सरचिटणीस सौ वंदना ताई तिकोटे उपस्थित होते