सोलापूर /प्रतिनिधी भैय्या खिलारे:
मराठी संस्कृतीत मकरसंक्रांत सणाला खूप महत्त्व आहे. विवाहीत महिलांसाठी हा सण म्हणजे एक पर्वणी असते. मोठ्या संख्येने विवाहित महिला हा सण उत्साहात साजरा करतात. अशाच प्रकारे दिवसरात्र सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी रस्त्यावर उभे राहून कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस भगिनी कर्तव्यावर असताना सुद्धा वेळात वेळ काढून मकर संक्रांतीचा सण साजरा करताना.