कर्मयोगी आणि निरा भिमा कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शिरसटवाडी आणि निमसाखर गावाच्या परिसरातील 110 ऊसतोड मजुरांची मोफत आरोग्य तपासणी संपन्न
बुधवार दिनांक 15/1/2025 रोजी सकाळी.8.30 वाजता कर्मयोगीच्या कार्यक्षेत्रातील विभाग. शेळगांव विभागाच्या परिसरातील शिरसटवाडी च्या जवळी ऊसतोड मालक. सुरेश गजानन कदम , भागवत शिंगाडे, टोळी मालक. अशोक बबनराव जगताप, नवनाथ कृष्णा कदम, आणि नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शिरसटवाडी, निमसाखर, गावाच्या परिसरातील फड मालक. अंबादास आबाजी कदम, युवराज सर्जेराव रणमोडे .टोळी मालक. सोमीनाथ गेना सांगळे, विठ्ठल एकनाथ गायकवाड, गणेश भास्कर गायकवाड, किसन नामदेव गायकवाड, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी करता वेळी निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय श्री लालासाहेब पवार यांच्या शुभहस्ते आरोग्य तपासणी सुरुवात झाली त्याप्रसंगी कर्मयोगीचे शेळगाव विभागाचे विभाग प्रमुख माननीय श्री ए बी जगताप साहेब तसेच निरा भिमा चे काटी विभागाचे प्रमुख माननीय श्री भागवत पाटील साहेब, कर्मयोगी चे कर्मचारी पिंटू शिंदे साहेब, मुलानी एस एम साहेब, निरा भिमाचे कर्मचारी सचिन घोरपडे साहेब, घोरपडे राजेंद्र साहेब, निंबाळकर शामराव साहेब, यांच्या मार्गदर्शनाखाली आजची आरोग्य तपासणी संपन्न झाली. निमसाखर गावातून इंदापूर कडे जात असताना निमसाखर गावातील गणेश पंढरीनाथ धनवडे दिव्यांग यांच्या घरी जाऊन डॉक्टरांनी तपासणी करून मोफत औषधी दिली. त्यावेळेस गणेश धनवडे यांचे आई-वडील उपस्थित होते. त्याबरोबर सर्व आरोग्य टीम उपस्थित होती. गणेशच्या घरी चहापाणी घेऊन इंदापूरला आलो. आजची आरोग्य तपासणी संपन्न झाली.