उद्योग शिलता आणि सामाजिक बांधिलकीचा नव आदर्श जोपासणारे पुरोगामी डॉ दाम्पत्य डॉ कुमार लोंढे व डॉ सौ पंचशीला कुमार लोंढे
~आंबेडकरी चळवळीत अनेक जण वैचारिक पातळीवर विकसित होऊन शोषण शक्ती चे विरोधात सातत्याने लढत असतात , कधी न्याय मिळवून देण्याच्या प्रक्रियेत पोलीस स्टेशन ते न्यायालयीन व्यवस्था पर्यंत , शासकीय योजना वंचित समाजाच्या पदरात टाकण्यासाठी ही असेच अनेक जण तहसील कचेरी , जिल्हा परिषद विभाग , समाज कल्याण विभाग , जिल्हाधिकारी कार्यालय येथे संघर्ष करताना दिसतात , फुले शाहू आंबेडकर विचार धारे वर आघात झाला की रस्त्यावर उतरून निषेध मोर्चे काढून शासनाला धारेवर धरणारे ही अनेक जण आहेत , आपली हीच सेवा कविता , नाट्य , कथा , आणि वैचारिक लिखाण करून हे जनजागृतीचे काम पुढे नेत असतात , कोणी धम्मा चे काम करते , कोण वृत्तपत्र , इलेक्ट्रॉनिक मीडिया याचे पोर्टल चे माध्यमातून काम करत राहतात , त्यांचे त्यांचे योगदान समाज व्यवस्थेत असतेच असते , कोणी एक व्यक्ती समाजाचे सर्व प्रश्न हातळण्या इतकी सक्षम कधीच नसते म्हणून प्रत्येकाने आपापल्या विभागात स्किल मिळवणे आवश्यक असते हे शहरी भागात जिथे समाज संख्या मोठी आहे , आणि अनेक साधने हाताशी आहेत तिथे हे काम ग्रामीण भागाच्या तुलनेने सोपे असते दूर खेड्यात जिथे हाताच्या बोटावर मोजले जाणारी समाजाची संख्या आहे , जे गाव कोणत्याही मुख्य रस्त्यापासून स्टेट हायवे पासून किमान 12ते 15किलोमिटर अंतरावर आहे , साधन सामुग्री ची कमतरता आहे , केवळ अश्या गावात जन्म झाला म्हणून मुंबई सारख्या शहरात प्रॅक्टिस असताना ती सोडून गावाकडे येऊन आपला दवाखाना काढून त्या मार्फत समाज सेवा देताना फक्त जात सीमित सेवा न ठेवता सोशल डेव्हलपमेंट म्हणून थेट पंढरपूरच्या वारीत ही सेवा देणारे डॉ दाम्पत्य म्हणून लोंढे परिवार माळशिरस आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमा ओलांडून केंव्हाच पुढे गेले आंतरराष्ट्रीय पातळीवरील दुबई येथील संस्थेने त्यांची दखल घेऊन त्यांच्या शैक्षणिक सेवेचा सन्मान पुरस्कार देऊन केला , हे काम सहजा सहजी घडलेल नाही , या मागे अथक परिश्रम डॉ कुमार लोंढे यांचे आहेत , तसेच त्यांच्या कार्यासाठी मदतगार ठरावे म्हणून सदाशिवराव देठे यांचे पुत्र ज्यांना सर्व जण मामा या नावाने ओळखतात त्यांनी एक रुपयाची ही अपेक्षा न करता शैक्षिणक प्रयोजनासाठी स्वतः ची एक एकर जमीन शाळे साठी दान केली , याच जागेवर या दांपत्याने निवासी , ज्युनियर कॉलेज पर्यंतची शाळा काढली , तिचे बांधकाम ही केले आणि विद्यार्थी ने आण करण्यासाठी स्कूल बस ही संस्थेच्या दारात उभ्या केल्या , हे करत असताना शासकीय अनुदान नाही , समाजाची देणगी रूपाने मदत नाही , पण स्वतः चे वैद्यकीय प्रॅक्टिस मधून गरीब आणि अनाथ मुलांना एक रुपया ही फी न आकारता शैक्षणिक दत्तक घेऊन त्यांचे कपडे , दप्तर , आणि वह्या पुस्तके (साहित्य)देणारे डॉ केवळ विरळच ,,,,,त्याची फार मोठी जाहिरात नाही , समाजावर उपकार करतोय अशी भावना नाही , उलट डॉ बाबासाहेब आंबेडकर , आणि माता रमाई यांच्या त्याग आणि संघर्ष यातून आम्हाला शिक्षणाची प्रेरणा मिळाली , नाही तर आम्ही ही गारवाड चांदापुरी येथून दारूच्या भट्टिवर काम करून पहिल्या धारेची दुसऱ्या धारेची म्हणून गावठी दारू काढत बसलो असतो आणि दुसऱ्याला विकता विकता आम्ही ही ढोसत बसलो असतो अस डॉ सांगतात , डॉ यांचे बंधू लहू लोंढे हे कृषी क्षेत्रात खते , पेस्टीसाईड, असलेल्या नव भारत कंपनीत ऑफिसर आहेत , , एकंदरीत हे सर्व कुटुंब वेगवेगळ्या उद्योग जगतात स्वतः ला हरवून घेत मग ते क्षेत्र बँकिंग असो वा पतसंस्था , ,,, या निर्मितीचा ध्यास त्यांनी घेतलेला आहेच इतकं सारं करत असताना ही ते सामाजिक कार्यक्रम , मोर्चा यात ही त्यांचा सहभाग नोंदवतात , आणि स्वतः ची चारचाकी घेऊन जाताना संयोजक यांचे कडून साध्या डिझेल ची ही अपेक्षा ठेवत नाहीत याच मला नेहमी आच्छर्य वाटत आलेलं आहे , त्यात आमच्या सारख्या कार्यकर्त्याचा ही भार त्यांचेवर टाकताना आम्हाला अवघड वाटत , कधी चांदापुरीला गेलो तर डॉ व ताई जेवल्या शिवाय पाठवत नाहीत , माझा एकच आग्रह डॉ कडे असतो , तो शाकाहारी कोबु तेवढा मला चारू नका पण त्यांची आपुलकी आणि आपलेपणाची भावना इतकी मोठी आहे की आज मी म्हणजे डॉ कुमार लोंढे व डॉ म्हणजे मी ,, एकच आत्मा दोन शरीरात वावरतो आहे इतके आम्ही एकरूप आहोत , माझे नातेवाईक हे फक्त चळवळीतील कार्यकर्ते असतात , तसे हे डॉ दाम्पत्य माझे नातेवाईक आहेत , त्यांच्या प्रत्येक संघर्षात , सुखात मी आहे , सदाशिवराव देठे प्रशालेच्या वरच्या मजल्या चे भूमी पूजन माझे पुतणे , भैय्या बाबर यांचे हस्ते संविधान साक्षीने करण्यात आले , आणि मला अगदीच राहवलं नाही , एक कौतुकाची थाप , आणि आनंदात सहभागी असल्याची भावना लेख लिहूनच व्यक्त होते ना?म्हणून हा लेखन प्रपंच