साईबाबा सेवा ट्रस्ट संग्रामनगर यांच्या वतीने साई प्राणप्रतिष्ठा 28वा वर्धापन दिन व श्रीराम नवमी उत्सव निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

अकलूज (प्रतिनिधी) श्री साई प्राणप्रतिष्ठा 28 वा वर्धापन दिन व श्रीराम नवमी उत्सवानिमित्त श्री साईबाबा सेवा ट्रस्ट संग्रामनगर अकलूज यांच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे रविवारी 06-04-2025 मार्च रोजी विविध दैनंदिन कार्यक्रमाचे आयोजन पुढील प्रमाणे सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत डॉ. धवलसिंह मोहिते पाटील व उर्वशी राजे धवलसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते अभिषेक व महापूजेचे आयोजन करण्यात येणार असून, याप्रसंगी श्रीमती पद्मजादेवी प्रतापसिह मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. सकाळी 8 ते 9 वाजेपर्यंत विकास नंदकुमार भोसले व सौ. प्रियंका विकास भोसले यांच्या हस्ते यज्ञ प्रज्वलन होणार आहे. सकाळी 10 ते 11/30 वाजेपर्यंत शिवशंभो भजनी मंडळाचे सामुदायिक भजन होणार आहे. तसेच दुपारी 12 वाजता श्रीराम जन्मोत्सव व महाआरती सहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील व सुलक्षणादेवी जयसिह मोहिते पाटील, यांच्या हस्ते संपन्न होणार आहे याप्रसंगी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, डॉ. एम के इनामदार, स्वरूपा राणी मोहिते पाटील, शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज चे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, ऋतुजा देवी संग्रामसिँह मोहिते पाटील, श्रीराज नंदकुमार माने पाटील, राजवर्धिनीदेवी श्रीराज माने पाटील पंकज शिवाजी गाडे (सरपंच, संग्रानगर ग्रामपंचायत)सौ. तेजश्री दिनेश माने-देशमुख (उपसरपंच) ग्रामपंचायत संग्राम नगरतसेच सर्व आजी-माजी सरपंच उपसरपंच सदस्य कर्मचारी अकलूज व संग्राम नगर हे उपस्थित राहणार आहेत. दुपारी 12:30 ते 2:30 वाजेपर्यंत महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेआहे. सायंकाळी 7 वाजता माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील व शितलदेवी धैर्यशील मोहिते पाटील(डॉटर मॉम च्या संस्थापिका)यांच्या हस्ते आरती संपन्न होणार आहे. याप्रसंगी अर्जुनसिंह मोहिते पाटील, वैष्णवीदेवी अर्जुनसिंह मोहिते पाटील,शिवतेजसिंह मोहिते पाटील, देवन्यादेवी शिवतेजसिंह मोहिते पाटील, क्रांतिसिंह किशोरसिंह माने पाटील, युगंधरादेवीक्रांतीसिंह माने पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणारआहेत. तसेच डॉ.रावसाहेब गुळवे, उदय टेके, मनोज रेळेकर, सागर नेवसे, प्रदीप भोसले, रोहन वेळापुरे, निखिल फुले, श्री व सौ जुनेजा,महेश खडके, तसेच लोकमान्य गणेशोत्सव मंडळ व शिवरत्नगणेशोत्सव मंडळ अकलूज, स्वामी विवेकानंद तरुण मंडळ,शिवगर्जना ग्रुप लोणार गल्ली अकलूज, क्रांतिसिंह रिक्षा स्टॉप,व अकलूज बुरुड समाज आदींचे विशेष सहकार्य लाभणार आहे. त्याचप्रमाणे सायंकाळी 5-30ते 6-30 वा. पर्यंत ब्रह्मचैतन्य महिला भजनी मंडळ माळीनगर, यांचे भजन तर सायंकाळी 7-30ते 8-30 वाजेपर्यंत ओंकार महिला भजनी मंडळ, शंकरनगर यांचे भजन संपन्न होणार आहे. तसेच शनिवारी 05-04-2025 रोजी सायंकाळी 4ते 8या वेळेतसाई मंदिर संग्रामनगर येथे डॉ. श्री व सौ. रवींद्र शिंदे यांचे वतीने दिव्यांग,अपंग,गतिमंद, मतिमंद,व अति चंचल मुलांवर मोफत निदान व औषध उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी सर्व साई भक्तांनी याचा लाभ घ्यावा. शिवाय ज्यांना महाप्रसादासाठी शिधा द्यायचा असेल त्यांनी (तांदूळ, गहू, गुळ,साखर डाळ तेल तूप, ) इत्यादी वस्तू अथवा रोख रक्कम देणगीदेऊन पावती घेऊन सहकार्य करावे
.असे आवाहन श्री साईबाबा सेवा ट्रस्ट चे कार्यकारी विश्वस्त किशोर सिंह माने पाटील व अध्यक्ष, सर्वं सदस्य यांनी केले आहे.