*बागेचिवाडी ग्रामपंचायतचा स्तुत्य उपक्रम*
अकलूज प्रतिनिधी रणजितदादा गायकवाड

बागेचीवाडी ग्रामपंचायत राबवला पतदर्शी कार्यक्रम राज्यात पहिल्यांदाच एक तारखेला पहिल्या दिवशीच कर्मचाऱ्यांच्या वेतनासह सेवापूर्ती बाबींची पूर्तता करून विमा कवच प्रदान ग्रामपंचायत सालाबाद प्रमाणे दरवर्षी अभिनव उपक्रम करत असते यावर्षी देखील ग्रामपंचायतचे सरपंच श्री कृष्णराज रामराव माने पाटील यांच्या कल्पक वृतीतून व श्री आबासाहेब पवार गटविकास अधिकारी माळशिरस यांच्या मार्गदर्शनानुसार बागेची वाडी ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतला वारंवार भेडसावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या व इतर बाबींच्या पूर्ततेच्या प्रश्नावर लक्ष घालून कर्मचाऱ्यांची कार्य वृत्ती वाढावी त्यांना वेतनातून सक्षमता लाभावी व समाधान लाभावे जेणेकरून त्यांच्या दैनंदिन कामकाजात काम करण्याची वृत्ती अतिशय कार्यक्षम व्हावी यासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सर्व सेवा समस्या 100% पहिल्याच दिवशी म्हणजे एक एप्रिल रोजी पूर्तता करून राज्यात एक आदर्श व्हावा या दृष्टीने पाऊल टाकण्याचे ग्रामपंचायतीने ठरवले
या सर्व निर्णयास उपसरपंच व ग्रामपंचायत व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य यांनी देखील सकारात्मक प्रयत्न करून दिनांक एक एप्रिल रोजी कर्मचाऱ्यांना माहे मार्च चे वेतन तसेच भविष्य निर्वाह निधी, सेवा पुस्तक नूतनीकरण ,नोंदीप्रमाणिकरण कोणतीही थकबाकी न ठेवता कर्मचाऱ्यांचा भारतीय पोस्ट सेवांतर्गत वार्षिक विमा काढला असून कर्मचाऱ्यांना एक्सीडेंटल मृत्यू, अपंगत्व किंवा पॅरालिसिस सारखे गंभीर आजार झाल्यास दहा लक्ष रुपये, कॉमा सारख्या आजार झाल्यास एक लाख रुपये, तसेच शिक्षण घेत असलेल्या दोन मुलांना प्रत्येकी एक लाख रुपये रुपये प्रमाणे दोन लाख रुपये मृत्युपश्चात शैक्षणिक भत्ता, स्थायी अपंगत्व आल्यात किंवा कॉमन डिसीज झाल्यास 50 हजार रुपये तात्काळ मदत यासारखे विमा पॉलिसी काढून कर्मचाऱ्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीने राज्यात पथदर्शी कार्यक्रम केला असून कार्यक्रमाची सर्वत्र चर्चा होत आहे ग्रामपंचायत बागेची वाडी येथे सन्माननीय उपसरपंच श्री रियाज शेख यांच्या हस्ते ग्रामपंचायत कर्मचारी श्री सतीश दडस तसेच ग्रामपंचायत सदस्यश्री संजय कुमार कांबळे व श्री राहुल वाघ यांच्या हस्ते कर्मचारी अमोल हरिदास साळुंखे तसेच ग्रामपंचायत सदस्य सौ सुजाता घुले, सौ दुर्गा देवी जगताप, सौ राजश्री इंगळे व सौ शुभांगी साठे यांच्या हस्ते कर्मचारी स्वप्नील कदम यांना विमा पॉलिसीच्या प्रती प्रदान करण्यात आल्या तसेच या कार्यक्रमात गावात नूतन कृषी सहाय्यक पदी विराजमान झालेल्या श्री शाहरुख तांबोळी यांचा च्या मातोश्री समवेत यशाबद्दल कौटुंबिक सन्मान ग्रामपंचायत मार्फत करण्यात आला त्यावेळी माजी उपसरपंच श्री दत्तात्रय गायकवाड , ग्रामसेवक एक आर शेख तसेच श्रीअमोल चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामपंचायत दरवर्षी अभिनव उपक्रम राबवत असते यामध्ये ग्रामपंचायतीने गेल्यावर्षी दोन मुलीवर ऑपरेशन करणाऱ्या लाभार्थींना प्रत्येकी 5000 प्रमाणे ठेवी 18 वर्षापर्यंत ठेवून मुलगी 18 वर्षे झाल्यानंतर त्या एफ डी सोडवता येणार आहेत अशा प्रकारे मुली सक्षम करण्यासाठी कार्यक्रम घेतला होता तसेच गेल्या वर्षी ग्रामपंचायतीने मोफत चष्मे व भव्य आरोग्य शिबीर घेऊन 5 15 चष्म्याचे मोफत वाटप केले होते व २८जणांना त्यांना मधुमेह झाल्याचे निष्पन्न झाल्याने तसेच सात लोकांना रक्त व लघवी संबंधी विकार असल्याचे आरोग्य तपासणी निष्पन्न झाल्याने उपचार करणे सोयीचे झाले