जयसिंह मोहिते पाटील यांच्या अमृत महोत्सवानिमित्त कोथरूड पुणे येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न ..
.पुणे..





शिक्षण प्रसारक मंडळाचे मा. अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते पाटील उर्फ बाळ दादा यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील विद्यालय, कोथरूड येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रशाला समितीचे सदस्य डॉ. बाळकृष्ण गायकवाड, पुणे जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. अजय तायडे, डेंटल सर्जन डॉ.सचिन नेहरकर ,होमिओपॅथी तज्ञ डॉ.दयानंद पवार, डॉ. राजकुमार अंबड, डॉ.सोनाली जगदाळे, डॉ. अंजली,विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कुमारी जयश्री जावळे मॅडम यावेळी उपस्थित होत्या.
डेंटल सर्जन डॉ.सचिन नेहरकर यांनी दातांची निगा ही अत्यंत महत्त्वाची असून तोंडाच्या कॅन्सर पासून मुक्त व्हायचे असेल तर दिवसातून दोन वेळा दात स्वच्छ घासणे गरजेचे असल्याचे सांगत सकाळच्या पेक्षा रात्री दात घासणे हे आरोग्यासाठी फलदायक असल्याचे सांगत दात घासताना कशा पद्धतीने दात घासले पाहिजेत हे प्रात्यक्षिकासह सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा प्रशाला समितीचे सदस्य डॉ. बाळकृष्ण गायकवाड यांनी बाळ दादांच्या कार्याची महती उपस्थितींना सांगत सहकार, सामाजिक,राजकीय क्षेत्रामध्ये जयसिंह मोहिते पाटलांनी स्वकर्तृत्वावर जे काम केले आहे त्याची माहिती देत बाळदादांचा आदर्श सर्वांनी घ्यावा असे सांगत दादांनी शतायुषी व्हावे अशा शुभेच्छा दिल्या.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका कु. जयश्री जावळे मॅडम यांनी बाळ दादांची कामावरची निष्ठा,वेळ व कार्य तत्परता यांची माहिती सांगत, वेळेला महत्त्व देणारे दादांनी शतायुषी वाढदिवस साजरा करावा अशा शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिबिरामध्ये जवळजवळ 200 जणांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. बाळदादांच्या वाढदिवसानिमित्त प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी 75 व्या वाढदिवसानिमित्त 75 ग्रिटींग कार्ड बनवली होती.त्याचबरोबर विविध खेळांच्या स्पर्धांचे उद्घाटन सुद्धा यावेळी संपन्न झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक श्री कारूटे सर यांनी केले तर आभार श्री.मुलानी सर यांनी मांनले.यावेळी अत्राम सर,चौधरी सर, खंडागळे सर,शिपाई बाविस्कर इ.उपस्थित होते.