जिजाऊ रथयात्रेचे सोमवारी माळशिरस तालुक्यात आगमन स्वागताची जय्यत तयारी

अकलूज (प्रतिनिधी) 23 मार्च रोजी जिजाऊ रथ यात्रा सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या ठिकाणी आगमन करीत असून यानंतर सायंकाळी पंढरपूर येथे सभा व मुक्काम संपल्यानंतर सोमवार दि 24 मार्च रोजी सकाळी ही रथ यात्रा दसुर या ठिकाणाहून माळशिरस तालुक्यात आगमन करीत आहे

माळशिरस तालुक्यात रथ यात्रेच्या स्वागताची जय्यत तयारी झाल्याची माहिती मराठा सेवा संघाचे माळशिरस तालुकाध्यक्ष निनाद पाटील यांनी दिली
यावेळी कार्याध्यक्ष अमोल माने, ,भारत सांगडे,सचीव राजेंद्र मिसाळ, जिजाऊ ब्रिगेडच्या माळशिरस तालुकाध्यक्ष शारदा चव्हाण, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष दिगंबर मिसाळ, उपाध्यक्ष सचिन पराडे आदी मान्यवर उपस्थित होते . मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांच्या संकल्पनेतून ही रथयात्रा काढण्यात आली असून राज्यभरातील मराठा समाज बांधवांना एकत्रित करण्यासाठी मराठा जोडो अभियान राबविण्यात येत असून त्यासाठी 18 मार्च रोजी शहाजी महाराज यांच्याजन्मदिनानिमित्त वेरूळ येथील भोसले गढी येथून जिजाऊ रथयात्रेस प्रारंभ झाला आहे
माळशिरस तालुक्यात पंढरपूर वरून ही रथयात्रा माळशिरस तालुक्यातील दसुर या गावी सकाळी सोमवारी सकाळी 9 .00वा येत आहे त्या ठिकाणी दसुर ,खळवे व पंचक्रोशीतील बहुजन समाज बांधव व ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे यानंतर या रथयात्रेचे तोंडले, बोंडले, वेळापूर, खंडाळी, चौंडेश्वरवाडी, माळेवाडी अकलूज ,पंचवटी, माळीनगर, पायरी पूल (महाळुंग नगरपंचायत) 25 ,4 ,लवंग, संगम या ठिकाणचे ग्रामस्थ, विविध सामाजिक, राजकीय संघटना व बहुजन समाजाच्या वतीने ठिकठिकाणी या रथयात्रेचे स्वागत केले जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली
माळशिरस तालुक्यातील संगम या माढा तालुक्याच्या सरहद्दीवरील गावात रथ यात्रेचे सायंकाळी 4.00 वा स्वागत केल्यानंतर ही रथ यात्रा टेंभुर्णी कडे प्रयाण करणार असून सायंकाळी कुर्डूवाडी या ठिकाणी या रथयात्रेचे स्वागत करून सायंकाळी कुर्डूवाडी येथे सभेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली या रथयात्रेत सर्व बहुजन बांधवांसह मराठा बांधवांनी ठिकठिकाणी उपस्थित राहावे असेही यावेळी सांगण्यात आले