सोलापूर /प्रतिनिधी भैय्या खिलारे:
चंदूर ता.हातकणंगले. येथे ग्राम पंचायत चंदूर , विद्यार्थी युवक सार्वजनिक ग्रंथालय चंदूर आणि कवि सरकार स्वाभिमानी वाचन मंदिर इंगळी यांनी १६ वे मराठी ग्रामीण साहित्य संमेलनामधे माण तालुक्याची सुकन्या व झुंजार न्युज महाराष्ट्र संपादिका कु.सोनाली एकनाथ माने ह्यांना साहित्य साधना पुरस्कार प्रदान करण्यात आला
या कार्यक्रमावेळी सकाळी ग्रंथदिंडी काढून संमेलन सुरू झाले यावेळी सुप्रसिद्ध उद्योजक मा.रामदास माने माजी राज्यपालं सिक्कीम माजी खासदार मा.श्रीनिवास पाटील त्यावंबरोबर माजी विभागीय आयुक्त मा.प्रभाकर देशमुख माजी विभागीय आयुक्त व रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा.चंद्रकांत दळवी पाटील यांच्या हस्ते साधना पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवर व आमचे पत्रकार बंधू तसेंच विद्यार्थी व सर्व पाहुणे मोठ्या संख्येने उपस्थित होते .