*सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील साहित्यिक पुरस्कार जाहीर*
अकलूज (प्रतिनिधी )श्री विजय गणेशोत्सव मंडळ पब्लिक ट्रस्ट, शंकरनगर-अकलूज यांचे वतीने सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील साहित्य पुरस्कार २०२५ वितरण सोहळा मा. श्री. मा.श्री. विजयसिंह मोहिते- पाटील माजी उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे मार्गदर्शनाखाली गेली तीन वर्षे दिले जात आहेतयावर्षी सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील विशेष साहित्यिक पुरस्कार लेखक, कांदबरीकार *विश्वास पाटील* यांना जाहीर करण्यात आला आहे.तर साहीत्यीक पुरस्कार कथाकथनकार व लेखक, कवी *आप्पासाहेब खोत* यांना देण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील इतिहासाचे अमुलाग्र लेखन करून अभ्यासकांना मोलाचे मार्गदर्शन केलेली ग्रंथसंपदा लिहून इतिहास लेखनात महत्वाची भर टाकल्याबद्दल *गोपाळराव देशमुख* यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे या शिवाय परिसस्पर्श या चरित्र ग्रंथाचे लेखक , कथा पटकथा एकांकिका, लघुनाटीका, दिग्दर्शक, मालीका, चित्रपट गीत असे अष्टपैलू लेखक *प्रमोद जोशी* यांनाही पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
*सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील साहित्य पुरस्कार-२०२४ वितरण सोहळा बुधवार दि. १५/०१/२०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता सहकार महर्षि शंकरराव मोहिते- पाटील सहकारी साखर कारखाना प्रशासकीय कार्यालयातील उदय सभागृह येथे होणार आहे*सर्व साहित्य प्रेमी , वाचक, लेखक , कवी यांनी सदर पुरस्कार वितरण समारंभास उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.