


अकलूज येथे मराठा वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन..
अकलूज, प्रतिनिधी ः सकल मराठा समाज व सगेसोयरे वधु-वर सेवा केंद्र यांच्या वतीने सोलापूर व परीसरातील जिल्ह्यातील मराठा समाजातील विवाहच्छूक वधु-वरांसाठी अकलूज ता.माळशिरस येथे २ फेब्रुवारी रोजी शहरातील श्री.अकलाई देवी मंगल कार्यालय, ग्रामदैवत श्री.अकलाई देवी मंदिरासमोर, टेंभुर्णी रोड,अकलूज ता.माळशिरस जि.सोलापूर,येथे वधू-वर महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून इच्छुक वधु-वरांनी मोठ्या संख्येने आपली नाव नोंदणी करून हा मेळावा यशस्वी करावा, असे आवाहन सकल मराठा समाजाचे व सगेसोयरे वधु-वर सेवा केंद्रांचे संचालक, हरीभाऊ जगताप, उद्योजक संदिप वाखुरे यांनी दिली
या मेळाव्यात प्रा. नागनाथ बागल ,मराठा सेवा संघाचे सदाशिव पवार, मराठा महासंघाचे अमोल पवार ,जिजाऊ ब्रिगेड पुणे विभाग अध्यक्ष शिवमती, मिनाक्षीताई जगदाळे,सरपंच टेंभुर्णी ग्रामपंचायत व सोलापूर जिल्हा जिजाऊ ब्रिगेड अध्यक्ष शिवमती, सुरजाताई बोबडे,अहिल्यानगर जिजाऊ ब्रिगेडच्या माजी अध्यक्ष शिवमती,संपुर्णाताई सावंत ,वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचे अभिजित बाबर,नवनाथ बोडखे, महादेव काळे ,प्रा.जयवंत माने ,शिक्षक संघटने नेते अजयकुमार पाटील,मराठा सेवक शिवराम गायकवाड, दत्ता गोरे,आशुभाऊ ढवळे,पत्रकार भारत मगर, गणेश जाधव रंजितदादा गायकवाड,यांच्या प्रमुख उपस्थित मध्ये होत आहे.
मराठा समाजातील अनेक तरुण-तरुणी इच्छित स्थळ मिळत नसल्याने अविवाहित आहेत. वराची किंवा वधूची माहिती घेऊन त्यांना मनपसंत जोडीदार मिळवून देण्यासाठी ना नफा ना तोटा तत्त्वावर सगेसोयरे वधु-वर सेवा केंद्र प्रयत्न करणार आहे. त्याचे पहिले पाऊल सोलापूर जिल्ह्यात या वधूवर महामेळाव्याने उचलले आहे. अनेक पालकांनी सगेसोयरे वधु-वर सेवा केंद्राकडे वधूवर मेळावा घेण्याची विनंती केल्याने समाजाच्या आग्रहाखातर या मेळाव्याचे आयोजन केले आहे. इच्छुक वधू-वर किंवा त्यांच्या पालकांनी या वधूवर मेळाव्यात सक्रिय सहभाग घेऊन विवाहच्छूक वधु-वरांची नावनोंदणी सगेसोयरे परिवाराचे हरीभाऊ जगताप, उद्योजक संदिप वाखुरे, शिवाजीराव देशमुख, सरिता पाटील, चित्रा देशपांडे यांच्याकडे मेळाव्याच्या स्थळी करावी किंवा 9689047270 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन सगेसोयरे परिवार व सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.