सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आणि इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे, विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब, येथे कार्यशाळेचे आयोजन
निमसाखर (प्रतिनिधी )
इंग्रजी विभाग आणि आय.क्यू.ए.सी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 28 मार्च 2025 रोजी “रिसर्च अँड प्रोफेशनल डेव्हलपमेंट” या विषयावर महाविद्यालयामध्ये एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आले होते कार्यशाळेचे प्रस्ताविक इंग्रजी विभागप्रमुख डॉ. विलास बुवा यांनी केले त्यामध्ये त्यांनी रिसर्च अँड प्रोफेशनल डेव्हलपमेंट तसेच सदर कार्यशाळेचे स्वरूप आणि उद्देश याची मांडणी केली.या एकदिवशीय कार्यशाळेचे उद्घाटन संस्थेचे सचिव- वीरसिंह रणसिंग यांच्या हस्ते करण्यात आले. वीरसिंह रणसिंग यांनी या कार्यशाळेसाठी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये त्यांनी अकॅडमीक डेव्हलपमेंट साठी असणाऱ्या गोष्टींची चर्चा केली व या कार्यशाळेसाठी शुभेच्छा दिल्या. उद्घाटन सत्राचे आभार कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.विजयी केसकर यांनी मानले.पाहुण्यांचा परिचय इंग्रजी विभागातील विद्यार्थिनी कुमारी श्रुती साबळे आणि शिवानी चव्हाण यांनी करून दिला.त्यानंतर प्रथम सत्रात डॉ. सुमन पांडे यांनी मार्गदर्शन केले त्यामध्ये त्यांनी रिसर्च अँड प्रोफेशनल डेव्हलपमेंट संदर्भात विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना मार्गदर्शन केले. विशेषतः आपण सतत नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे.काळाच्या बरोबर चालायला शिकणे गरजेचे आहे अशी अनेक उदाहरणे देऊन त्यांनी आपण आपला संशोधनात्मक आणि व्यावसायिक विकास कशाप्रकारे करू शकतो याविषयी मार्गदर्शन केले.सत्र दोन मध्ये डॉ. दादासाहेब ढेंगळे यांनी “हाऊ टू राईट आर्टिकल्स” या विषयावरती मार्गदर्शन केले. त्यामध्ये त्यांनी संशोधन पेपर लिहीत असताना घ्यावयाची काळजी आणि त्यासाठी लागणारी साधनसामग्री याविषयी सखोल अशी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपप्रचार्य ज्ञानेश्वर गुळीग यांनी केले.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय केसकर, उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. विलास बुवा, आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. प्रशांत शिंदे शारीरिक शिक्षण विभाग संचालक डॉ.सुहास भैरट तसेच इतर विभागप्रमुख व प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. विशेष सहकार्य इंग्रजी विभाग दिशा घाडगे, कोमल कोळी,गौरी बुधावले, संजना पाटोळे,निखिल भोसले, काजल मिसाळ….या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.विद्या गुळीग यांनी केले.