डॉ. उषा भोईटे पवार यांच्या पुस्तकाचे दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलनात होणार प्रकाशन
अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा २१, २२व २३ फेब्रुवारी २०२५ ला दिल्ली येथे होणार आहे.
या साहित्य संमेलनात निमगाव केतकी येथील लुमेवाडी येथे कार्यरत असणाऱ्या आदर्श, कार्यकुशल, उत्कृष्ट शिक्षिका डॉ. उषा भोईटे पवार यांच्या ” अनुभूतींचे धागे” या ललित लेख संग्रहाचे प्रकाशन होणार आहे. तसे पत्र ग्रंथ निवड समितीचे अध्यक्ष घनश्याम पाटील यांनी त्यांना दिले आहे. याच संमेलनात त्यांच्या “वास्तव “या कवितेचे सादरीकरण देखील होणार आहे. साहित्य संमेलन शिवाजी महाराज साहित्य नगरी (तालकटोरा स्टेडियम)दिल्ली येथे होणार आहे .
संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर दिल्लीत पहिल्यांदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे . मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या संमेलनाचे उद्घाटन करणार आहेत .स्वागताध्यक्ष म्हणून पद्मविभूषण मा.शरद पवार तर संमेलनाध्यक्ष म्हणून डॉ.तारा भवाळकर यांची निवड झाली आहे. 22 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता डॉ.उषा भोईटे पवार यांची कविता सादर होणार आहे. डॉ. उषा भोईटे पवार यांचे आजपर्यंत अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत .तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर शोधनिबंध प्रकाशित आहेत. हे त्यांचे पहिलेच ललित संग्रह पुस्तक प्रकाशित होत असून ते अखिल भारतीय साहित्य संमेलनात प्रकाशित होत आहे ही बाब इंदापूर तालुक्यासाठी गौरवास्पद आहे.नुकत्याच फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या तिसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनात डॉ.उषाभोईटे पवार यांना निमंत्रित साहित्यिक म्हणून बोलवण्यात आले होते.यापूर्वी त्यांनी नवीन शैक्षणिक घोरणा नुसार अभ्यासक्रमाच्या दर्जेदार पुस्तकांची निर्मिती व प्रकाशन केले आहे.त्याची दखल घेऊन एप्रिल 2022मध्ये महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सन्मानित केले होते. २०११पासून त्यांनी इंदापूर तालुक्यातील इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना “परीक्षेला सामोरे जाताना” या विषयावर सतत कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन केले आहे. त्यांची इंदापूर तालुक्याच्या शिक्षण समितीवर शिक्षण तज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.