*डॉ.संभाजी करांडे पाटील यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी वैद्यकीय आघाडीच्या पुणे शहर अध्यक्षपदी निवड…
.*मुंबई ..आज दि.20 एप्रिल रोजी डॉ.संभाजी करांडे पाटील यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी वैद्यकीय आघाडीच्या पुणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.नियुक्तीचे पत्र वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.हसन मुश्रीफ साहेब,आमदार विक्रमजी काळे व एनसीपी वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ.बाळासाहेब पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

यावेळी होमियोपॅथीच्या नेत्या डॉ.रजनी इंदुलकर,होमियोपॅथीचे नेते डॉ.अरुण भस्मे,होमियोपॅथि कॉलेज फेडरेशनचे डॉ.गजानन पोळ ,महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे प्रशासक डॉ.बाहुबली शाह,राष्ट्रवादी कॉंग्रेस वैद्यकीय आघाडीचे मुख्य संघटक डॉ.बाळकृष्ण गायकवाड ,डॉ.अमित भस्मे,डॉ.नितीन गावडे,एनसीपी वैद्यकीय आघाडीचे राज्य उपाध्यक्ष डॉ.हेमंत ठुसे,अण्णासाहेब गरड, डॉ.ब्रिजपाल राजपूत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.डॉ.संभाजी करांडे पाटील हे पुणे डॉक्टर्स असोसिएशन व पुणे शहर व जिल्हा काँग्रेस वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे
.सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेऊन त्यांनी गोर गरीब रुग्णांसाठी मोफत औषधोपचार शिबिराचे आयोजन करून आरोग्य क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे.त्यांच्या या निवडीबद्दल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे,अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, राज्यसभा खासदार सुनेत्रावहिनी पवार,पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष दीपक मानकर यांनी अभिनंदन केले.