राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर्स सेल राज्यव्यापी मेळावा पुण्यात होणार….प्रदेशाध्यक्ष डॉ.बाळासाहेब पवार
अकलूज (प्रतिनिधी).24 एप्रिल 2025 रोजी एनसीपी डॉक्टर्स सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ.बाळासाहेब पवार सर यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील पदाधिकारी यांची बैठक हॉटेल प्रेसिडेंट,कर्वे रोड, पुणे येथे संपन्न झाली

.यावेळी पुणे शहर एनसीपी डॉक्टर्स सेलच्या पाठीमागील कामाचा आढावा घेण्यात आला.डॉक्टरांसमोरील चालू घडामोडीवर डॉ.दडस (इंदापूर) यांच्यावरील झालेला हल्ला,दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरण इ.समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करावा असे ठरले.एनसीपी डॉक्टर्स सेलचा मे महिन्यात पुणे शहरात राज्यव्यापी मेळावा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार,वैद्यकिय शिक्षण मंत्री ना.हसन मुश्रीफ,अन्न व औषध प्रशासन मंत्री ना.नरहरी झिरवाळ व पुणे जिल्ह्यातील आमदार व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात येणार असून त्या अनुषंगाने तयारीला लागण्याचे आदेश प्रदेशाध्यक्ष डॉ .बाळासाहेब पवार यांनी दिले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे डॉक्टर्स सेलचे मुख्य संघटक डॉ.बाळकृष्ण गायकवाड,राज्य उपाध्यक्ष डॉ.हेमंत ठुसे,राज्य उपाध्यक्ष डॉ.स्मृतीका भोसले,पुणे शहर अध्यक्ष डॉ.संभाजी करांडे,कार्याध्यक्ष डॉ.बाळासाहेब आहेर, डॉ.दयानंद पवार, डॉ.संजय खेडेकर, डॉ.एच.के.देशमुख, डॉ.सतीश आवळे, डॉ.राहुल दिघे, डॉ.संतोष महाजन, डॉ.अंकुश गदादे इ.पदाधिकारी उपस्थित होते.
