बागेचीवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते रणजितदादा गायकवाड यांची शिवसेना उपतालुका प्रमुख पदी नियुक्ती
शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या सोलापूर जिल्ह्यातील नुतन पदाधिकारी यांच्या नियुक्या नुकत्याच जाहीर करण्यात आल्या यामध्ये बागेचीवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते व मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे माळशिरस तालुका समन्वयक रणजितदादा गायकवाड यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची माळशिरस उपतालुका प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे
माळशिरस तालुका प्रमुख श्री सतिश सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची ध्येय धोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व महाराष्ट्र शासनाच्या लोकोपयोगी कल्याणकारी योजना राबविण्याचा संकल्प करून रणजितदादा गायकवाड यांनी आपल्या निवडीबद्दल पक्ष नेत्रुत्वाचे आभार मानले श्री गायकवाड यांच्या निवडिने अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या
