सहकार महर्षी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये मा. श्री. जयसिंह मोहिते पाटील उर्फ बाळदादा यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी व हेल्थ कार्ड वाटप शिबिर संपन्न
अकलूज. ता. ०१ : येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च,शंकरनगर -अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना व सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील इन्स्टिटयूट ऑफ पॅरामेडिकल सायन्सेस यांचे सयुंक्त विद्यमाने मा. श्री. जयसिंह मोहिते पाटील उर्फ बाळदादा यांच्या वाढदिवसानिमित्त दि. ०१/१२/२०२३ रोजी आरोग्य तपासणी व हेल्थ कार्ड वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विध्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या आरोग्याची तपासणी तसेच हेल्थ कार्ड वाटप करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांचे हस्ते करण्यात आले.
त्यानंतर शिबिराचे प्रास्ताविक प्रा. निलेशकुमार आडत यांनी केले. प्रास्ताविकामध्ये त्यांनी शिबिराचा उद्देश व महत्व याची थोडक्यात माहिती दिली. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी आपल्या मार्गदर्शनपर मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना शिबिराचे व आरोग्याचे महत्व सांगितले. तसेच संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी वेळोवेळी अश्याप्रकारचे शिबिराचे आयोजन केले जाईल असे त्यांनी सांगितले.
प्राचार्यानी मा. श्री. जयसिंह मोहिते पाटील उर्फ बाळदादा यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त करताना त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.
सदरच्या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी सर्व विभागाचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विध्यार्थी उपस्थित होते. शिबिरामध्ये एकूण १९८ शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विध्यार्थी व विद्यार्थिनीं यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबीर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. गौरव देशपांडे व सर्व स्वयंसेवकांनी काम पाहिले.


