अकलूज (प्रतिनिधी )देशभरात उत्साहात शिवजयंती साजरी होत असताना शिवजयंतीच्या निमित्ताने 21फेब्रुवारी रोजी अकलूज येथील महिलांना छावा हा चित्रपट मोफत दाखवण्यात आला .

नुकताच छावा हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे . धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा विषय त्यात हाताळला आहे . दुर्दैवाने आपल्याला इतिहास माहीत नसल्याने आपल्या देशाची व समाजाची अधोगती झाली आहे .
म्हणून या चित्रपटाद्वारे संभाजी महाराजांच्या बलिदानाचा विषय महीलांना माहिती व्हावा याकरिता भाजपचे जिल्हा सरचिटणीस श्री.सचिन शिंदे यांनी सदर चित्रपटाचे आयोजन केले होते .
दिवसेंदिवस बदलत चाललेल्या शिवजयंतीच्या स्वरूपामुळे आणि कर्णकर्कश डीजे साऊंड सिस्टिम मुळे त्यातील प्रेरणाच निघून गेलेली आहे . त्यामुळे शिवजयंतीचे ओंगळवाणे व किळसवाने दर्शन होऊ लागलेले आहे .
या पार्श्वभूमीवर समाज प्रबोधन व लोकशिक्षण करण्यासाठी श्री.सचिन शिंदे,शिवाजी घोडके,सुधीर पवार, शशी भोसले, यांनी विविध उपक्रम राबवताना छावा चित्रपट दाखवण्याचे नियोजन केले होते .