प्रार्थनास्थळांवर असणारे अनधिकृत भोंगे व त्या अनुषंगाने होणारे ध्वनी प्रदूषण यासंदर्भात भाजपा च्या वतीने अकलूज पोलीस ठाणे ला निवेदन
अकलूज (प्रतिनिधी )प्रार्थनास्थळांवर असणारे अनधिकृत भोंगे व त्या अनुषंगाने होणारे ध्वनी प्रदूषण यासंदर्भात भारतीय जनता पार्टीच्या वतीने अकलूज पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले .
या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार अनधिकृत भोंग्यांचा वापर व ध्वनी प्रदूषण करणाऱ्या सर्व प्रार्थनास्थळांवर कार्यवाही करण्याच्या सूचना सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आल्या आहे .
मा. सर्वोच्च न्यायालयानेही प्रार्थनास्थळांवरील अनधिकृत भोंगे व ध्वनी प्रदूषण कमी करण्यासंदर्भात स्पष्ट निर्देश दिलेले आहेत . महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनीही याविषयी सध्याच्या विधीमंडळ अधिवेशनात भाष्य केले आहे .
सध्या चालू असणाऱ्या सर्व शाळांच्या परीक्षा व नागरीकांचे आरोग्य या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाचा हा आदेश महत्वाचा आहे . सदरचे निवेदन कसलीही सामाजिक तेढ निर्माण करणारे अथवा कोणत्याही समाजाविरुद्ध नसून सामाजिक आरोग्य जपण्यासाठी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी आहे.असे भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिन शिंदे यांनी यावेळी सांगितले .
यावेळी भाजपा यूमोचे सूरज मस्के, रणजितदादा गायकवाड , संतोष करंडे, महेश लोहार, नवनाथ साठे , सागर देवकाते व हिंदूत्ववादी संघटनांचे गणेश इंगळे , शिवाजी घोडके , सूधीर पवार, सागर व्यावहारे,निखिल थोरात,शुभम सुर्यवंशी,वैभव वडितिले ,अभिजीत बाबर असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते .