रतन टाटा यांच्या नावाने व्हायरल होत असलेला मोफत रिचार्ज ची लिंक बनावट
अकलूज (प्रतिनिधी )जगप्रसिद्ध उद्योगपती व समाजसेवक रतन टाटा यांचा वाढदिवस 28डिसेंबर रोजी जगभरात उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. परंतु या गोष्टीचा गैरफायदा घेऊन काही समजवीघातक हॅकर्स नी एक बनावट लिंक बनवून रतन टाटा यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून 479रुपये चा 56दिवसांचा तर 666रुपये चा 84दिवसांचा मोफत मोबाईल रिचार्ज देण्याचा दावा करून बनावट लिंक बनविली आहे.यासंदर्भात टाटा यांच्या फेसबुक पेज वरून अधीक माहिती घेतली असता या दाव्यात कोणतेही तथ्य आढळून आले नाही.सध्या सोशल मीडिया मधून ही लिंक व्हायरल होत आहे. वास्तविक पाहता ही लिंक ओपन केल्यानंतर ओपन करणाऱ्या व्यक्तीचा संपूर्ण डाटा हॅकर च्या ताब्यात जात आहे. आपला डेटा गोळा करून हे लोक ही माहिती कोणत्याही गैर कृत्या साठी वापरू शकतात. अथवा देश विघातक कृत्य करू शकतात. या लिंक वरून ही मंडळी आपला डाटा चोरी करू शकतात. तसेच आपल्या अकॉउंट वरून रक्कम देखील काढू शकतात.त्यामुळे कोणीही सदर लिंक ओपन करू नये. अथवा फॉरवर्ड करू नये. अन्यथा आपल्याला भविष्यात गंभीर संकटाला सामोरे जावे लागणार आहे. एव्हढे मात्र निश्चित.


