मालन भानुदास मुंगूसकर यांचे निधन ग्रामसेवक सुधाकर मुंगुसकर यांना मातृशोक
अकलूज (प्रतिनिधी )माळशिरस तालुक्यातील संग्रामनगर व सुळेवाडी येथील ग्रामसेवक सुधाकर मुंगूसकर यांच्या मातोश्री श्रीमती मालन भानुदास मुंगूसकर यांचे 12फेब्रुवारी रोजी पहाटे चार वाजता अकलूज येथील खाजगी दवाखान्यात उपचार घेत असताना निधन झाले.त्यांचे वय 72 वर्ष होते.त्यांच्या पश्चात पती भानुदास मुंगुसकर आणि विवाहित चार मुले व दोन विवाहित मुली असा परिवार आहे.14फेब्रुवारी रोजी त्यांच्या तिसऱ्याचा (सावडण्याचा )विधी सकाळी धानोरे येथे होणार आहे.त्या अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या. त्यांच्या निधनामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.