इंदापूर, टेंभुर्णी ,बार्शी व मोहोळ येथे बहुचर्चित “एक राधा एक मीरा” चित्रपटाचे प्रमोशन, चित्रपटातील कलाकारांना भेटण्याची मिळणार संधी / डॉ श्रद्धा जवंजाळ



मराठी चित्रपट सृष्टीतील बहुचर्चित महेश मांजरेकर प्रस्तुत”एक राधा एक मीरा” हा चित्रपट व्हॅलेंटाईन वीक चा मुहूर्त साधून 7 फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात आला आहे अवघ्या दोनच दिवसात चित्रपटग्रहात हा चित्रपट आल्यानंतर प्रेक्षकांनी अक्षरशा या चित्रपटाला डोक्यावर घेतले आहे
या चित्रपटातील सुप्रसिद्ध कलाकार गश्मीर महाजनी मृण्मयी देशपांडे व सुरभी भोसले या कलाकारांसह आदींनी अजरामर अशी भूमिका या चित्रपटात सादर केली असून हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या पिक्चरला चांगले रेटिंग प्राप्त होत आहे.
या चित्रपटात अजरामर भूमिका सादर करणारे कलाकार गश्मीर महाजनी सुरभी भोसले व मृण्मयी देशपांडे आपल्या सर्वांना भेटायला येत आहेत
आपल्या स्पेशल शो टेंभुर्णी, इंदापूर, बार्शी ,मोहोळ येथे चित्रपटगृहात आपल्यासमोर या कलाकारांसह चित्रपट पाहण्याची संधी वरील ठिकाणी प्रेक्षकांना मिळणार आहे यामुळे ज्यांना या कलाकारांना भेटावयाचे आहे त्यांनी लवकरात लवकर बुकिंग करावे लहानांपासून थोरांपर्यंत कोणीही बुकिंग करू शकते टेंभुर्णी येथे 11 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 12 ते 3 हा शो प्रेक्षक Book My Show वर बुक करू बार्शी येथेही 12 ते 3 चा शो बुक करू शकतात तसेच मोहोळ येथे 3 ते 6 चा शो उपलब्ध असून इंदापूर येथे 6 ते 9 शोच्या वेळेत या सर्व सेलिब्रिटींना भेटण्याची संधी उपलब्ध होणार आहे अशी माहिती पिंक रेवोल्युशन च्या माध्यमातून आयोजक डॉ. श्रद्धा जवंजाळ डॉ. कविता कांबळे अमोलिका जामदार यांनी दिली.