प्रवर्तन फौंडेशनच्या वतीने सीमेवरील जवान आणि काश्मीर खोऱ्यातील बांधवांना दिपावली फराळ व शूभेच्छा देण्यासाठी निनाद पटवर्धन आणि त्यांचे सहकारी काश्मीर येथील कूपवाडा जिल्ह्यातील माचिल सेक्टरमधील एलओसी वरती निघाले आहेत . त्यांच्या वाहनाचे पूजन श्री. धैर्यशीलभैया मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते अकलाई मंदिराच्या प्रांगणात करण्यात आले . यावेळी प्रवर्तन फौंडेशनचे श्री सचिन शिंदे ,भाजप शहराध्यक्ष महादेव कावळे, मुख्तर कोरबू यांच्यासह संघ भाजपचे विविध पदाधिकारी यांनी सर्वांना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या . यावेळी अकलूज व परिसरातील प्रवर्तन फौंडेशनचे कार्यकर्ते व हितचिंतक उपस्थित होते.




