सौ. पुष्पा माधवराव जाधव यांचे निधन
अकलूज (प्रतिनिधी )संग्रामनगर येथील रहिवाशी असलेले व अकलूज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विजयसिंह मोहिते विद्यालय वाघोली,येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री माधवराव लक्ष्मण जाधव यांच्या धर्मपत्नी सौ पुष्पा माधवराव जाधव (वय 56वर्षे )यांचे अल्पशा आजाराने दि 11/3/2025 रोजी संध्याकाळी 10वाजता निधन झाले. त्यांचेवर 12मार्च रोजी सकाळी9-30वाजता अकलई स्मशाभूमी येथे अंत्संस्कार करण्यात आले.
त्यांचा दशक्रिया विधी अकलाई घाट येथे 20मार्च रोजी सकाळी 9वाजता होणार आहे.
त्यांच्या पश्चात पती, दोन भाऊ, एक दीर,चार भावजया, दोन मुले, एक सून, नातवंडे, नणंद, असा मोठा परिवार आहे.
पत्रकार गणेश लक्ष्मण जाधव यांच्या त्या वहीनी होत्या. त्या अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या.त्यांच्या निधनामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.